ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत, आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड

मुंबई :- शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) धाड टाकली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी सुमारास रवींद्र वायकर यांच्या घरी धाड टाकली. ईडीच्या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रवींद्र वायकर यांच्या घरी धाड टाकल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचं पथक रवींद्र वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर ईडीच्या १० ते १२ जणांच्या पथकानं झाडाझडती सुरू केली आहे. तसेच, वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राथमिक कृषी पतसंस्थांकडे पुढील 3 वर्षांत जगातील सर्वात मोठी साठवण क्षमता असेल - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

Tue Jan 9 , 2024
– सध्या, 28 हजार प्राथमिक कृषी पतसंस्था सामायिक सेवा केंद्र म्हणून कार्यरत असून, भारत सरकारच्या 300 हून अधिक सेवा जनतेला पुरवत आहेत नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेल्या ‘पंतप्रधान साठवणूक ’ सुविधेमुळे प्राथमिक कृषी पतसंस्था आता कमी भांडवलात आधुनिक गोदाम बांधू शकतात, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे. या प्राथमिक कृषी पतसंस्था […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com