लोकायुक्तांकडून राज्यपालांना वार्षिक अहवाल सादर

मुंबई :- राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे (निवृत्त) यांनी राज्यपाल रमेश बैस यांची सोमवारी (दि. ११) राजभवन येथे भेट घेऊन त्यांना लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या कामकाजासंबंधीचा ४९ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला.

सन २०२१ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयात एकूण ६६१७ प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध होती. यापैकी ३२०२ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२१ च्या वर्ष अखेरीस ३४१५ प्रकरणे प्रलंबित राहिली, अशी माहिती लोकायुक्त कार्यालयाने दिली.   

महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्था गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर करण्यात यशस्वी ठरली आहे. चौकशीसाठी हाती घेण्यात आलेल्या तक्रारींपैकी जवळजवळ ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींमधील गाऱ्हाण्यांचे समाधानकारक निवारण झाले, असल्याचे लोकायुक्त कार्यालयाने नमूद केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय लोकअदालतीत 148 प्रलंबित प्रकरणात 46 लाख रुपयांचा निपटारा

Tue Sep 12 , 2023
रामटेक :- तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.एम.सरोदे यांचे अध्यक्षतेखाली दिवाणी न्यायाधीश एच.एस. सातपुते, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश डी.एस.सैदाने यांचे सहकार्याने दिवाणी न्यायालय रामटेक येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनल समोर दिवाणी व फौजदारी प्रकरणातील एकूण 148 प्रलंबित प्रकरणांचा आपसी तडजोड करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com