बीकेसीपी शाळेचे वार्षिक सांस्कृतिक उत्सव थाटात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– नुत्य, नाटिका, नुत्य नाटिका अशा भरघोष कार्यक्रमाने उपस्थिताना केले भावनिक मंत्रमुग्ध. 

कन्हान :- बिहारीलाल खंडेलवाल कॉम्प्रिहेंसिव पब्लिक स्कुल कन्हान चे वर्ष २०२३-२४ चे वार्षिक सांस्कृ तिक उत्सवात स्वागत नुत्य, अरूणाचल आदिवासी नुत्य, गरबा, बिहु नुत्य, इंग्रजी नाटक “बॉस ओह बॉस! ” पश्चिमी नुत्य, मंगला गौर, दक्षिणी नुत्य, पुरस्कार वितरण, ऑर्केस्ट्रा, पंजाबी नुत्य, तानाजी नुत्य नाटिका आदी भरघोष कार्यक्रमाने उपस्थिताना मंत्रमुग्ध करि त वार्षिक सांस्कृतिक उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

बुधवार (दि.१३) डिसेंबर सकाळी १०.३० वाजता बिहारीलाल खंडेलवाल कॉम्प्रिहेंसिव पब्लिक स्कुल कन्हान चे वर्ष २०२३-२४ चे वार्षिक सांस्कृतिक उत्सवाचे प्रमुख अतिथी मा. डॉ रेणुका तिवारी, संस्थेचे संस्थापक सदस्य महेश खंडेलवाल, अशोक भाटिया, मुख्याध्यापिका कविता नाथ  आदिच्या हस्ते स्वर्गीय श्री बिहारीलाल खंडेलवाल यांच्या प्रतिमे स पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून स्वागत नुत्याने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे, जेष्ट पत्रकार एन एस मालविय , प्राथमिक मुख्या ध्यापिका रूमाना तुरक सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित इयत्ता ५ ते १० वी च्या विद्यार्थ्यानी अरूणा चल प्रदेश आदिवासी नुत्य, गरबा नुत्य, बिहु नुत्य, इंग्रजी नाटक “बॉस ओह बॉस! ” पश्चिमी नुत्य ” चोक देयर बॉय अपाचे इंडियन”, मंगला गौर, दक्षिणी नुत्य, शाळेच्या मुख्याध्यापिका नाथ हयानी शाळा ही शिक्षणा सोबतच सांस्कृतिक, विविध स्पर्धा, खेळा मध्ये तर कन्हान चे नाव नागपुर जिल्हयात नावलौकि क करित आहे.

सर्व शिक्षक विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकास साधण्याकरिता परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्या च्या प्रगती करिता पालकांनी सुध्दा जास्त लक्ष देण्याचे त्यानी आवाहन केले. प्रमुख अतिथी डॉ रेणुका तिवारी हयानी शाळेचे व विद्यार्थ्याच्या कलागुणाचे कौतुक केले. तदंतर मान्यवराच्या हस्ते मार्च २०२३ मध्ये शाळे तुन व तालुक्यातुन प्रथम आलेली वैष्णवी सिंग ९४. २०%, तसेच शाळेतुन द्वितीय धनश्री शेंडे ९२.६० %, तृतिय स्नेहा केसेट्टी ९२.४०%, चतृर्थ रिया चव्हाण ९१.८०%, कु लावण्या पानतावने ने पाचवा क्रमाक पटकाविला सर्वाना नगदी रोख रक्कम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यानी ऑर्केस्ट्रा सादर केला, पंजाबी नुत्य आणि ५० विद्या र्थ्यानी तानाजी नुत्य नाटिका दमदार सादर केले.

तसेच सर्व विद्यार्थ्यानी नुत्य, नाटिका व नुत्य नाटिका सादर करून उपस्थिताना भावनिक मंत्रमुग्ध केल्याने ताना जी नुत्य नाटिकातील शिवाजी ची भुमिकेत हरभन गजभिये, तानाजी- अर्थव चौकसे, उदयभान- सुमेध लांजेवार हयाना पा शि संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे व्दारे प्रोत्साहन पर नगदी पाच, पाचशे रूपये बक्षीष देण्यात आले. तसेच संस्थेचे संस्थापक सदस्य महेश खंडेलवाल हयानी दोन लाख रूपये शाळेला बक्षीष देऊन शाळेचा गौरव केला. राष्ट्र गिताने कार्यक्रमाची सागंता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका ज्योत्स ना लांजेवार हयानी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मुख्याध्यापिका कविता नाथ, शिक्षक विनय कुमार वैद्य, प्रमोद करंडे, शुशिल उमाठे सह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी, विद्यार्थीनीनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उनगावच्या पोल्ट्री फॉर्म मधून 50 कोंबड्या चोरीला

Wed Dec 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उनगाव येथील शिद्रा पोल्ट्री फॉर्म मधून प्रत्येकी 2 किलो वजनाच्या 20 हजार रुपये किमतीच्या 50 कोंबड्या चोरीला गेल्याची घटना काल सायंकाळी 5 दरम्यान उघडकीस आली असून यासंदर्भात फिर्यादी सलमान अब्दुल कुरेशी वय 30 वर्षे रा बुनकर कॉलोनी कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com