वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही लवकरच कल्याणकारी मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

– आमदार संजय केळकर यांनी केली होती मागणी

यवतमाळ :- वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक आहे, अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत त्याचीही घोषणा लवकरच करू असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. ठाणेचे आमदार संजय केळकर यांनी याबाबतची मागणी केली होती.

यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेमार्फत सतत प्रयत्नशील होते. त्यामध्ये अशोक शिंदे, किरण कोरडे, राजू हनवते, राजू भलावी, श्रीराम खत्री, तुषार गुजलवार, सचिन कदम, मदन केळापुरे, प्रविण आगलावे, सुनील बोरकर, रवींद्र चव्हाण, संतोष शिरभाते, किशोर भेदरकर ईतर सर्व जेष्ठ सदस्य यांनी शासनाने मुर्त रूप द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणा-या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्वाचा घटक आहे.कामाची पध्दत, कामाची वेळ, अतल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने गेली पंधरा वर्षे यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी तत्कालिन कामगार मंत्री हसन मुश्रिफ, संभाजी पाटील निलंगेकर, दिलीप वळसे-पाटील व विद्यमान कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. संभाजीराव पाटील निलंगेकर कामगार मंत्री असताना त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली. या समितीने आपला अहवालही सादर केला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी शिफारस केली आहे. मात्र त्यानंतर चार वर्षे झाली तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा आ. संजय केळकर यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ही अनेक दिवसांपासुन पाठपुरावा करत आहेत. केळकर यांनी सध्या सुरू असणार्‍या अधिवेशनातही स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी केली. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र केले आहे, या घटकालाही न्याय द्यावा असा आग्रह व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना आ. श्री केळकर यांच्या मागणीबाबत सांगितले की, वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक आहे. ते कल्याणकारी मंडळाची मागणी अनेक वर्षांपासुन करत आहेत. आ. केळकर हेही चार वर्षांपासुन पाठपुरावा करत आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही न्याय देऊ, त्यांच्या कल्याणकारी मंडळाचीही घोषणा करू असे आश्‍वासन दिले.

घोषणा, अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातुन गेली पंधरा वर्षे पाठपुरावा करत आहोत. आ. संजय केळकर यांनी यावेळीही मागणी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्‍वासन दिले. ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे. आ. श्री केळकर यांच्या माध्यमातुन लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. लवकरात लवकर मंडळाची घोषणा व्हावी व अंमलबजावणी सुरू व्हावी अशी मागणी करणार आहोत अशी माहीती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार,कार्यकारणी सदस्य व ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बारी समाजाचे स्वतंत्र महामंडळ स्थापन झाल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांचा भव्य सत्कार 

Sun Jul 7 , 2024
वरूड :- बारी समाजाच्यावतीने राज्यभरातील शिष्ट मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देऊन समाजाला स्वतंत्र विकास महामंडळ द्यावे अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात केली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दाखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात सदर विकास महामंडळाची घोषणा केली त्यामुळे बारी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनिबश्री संत शिरोमणी रूपलाल महाराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!