विद्यापीठाच्यावतीने आयोजित 2021-22 वार्षिकांक स्पर्धेतील पारितोषिकांची घोषणा

व्यावसायिक व बिगर व्यावसायिक गटातील महाविद्यालयांचा 1 मे रोजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे हस्ते सत्कार

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाद्वारे प्रकाशित वार्षिकांक स्पर्धा घेण्यात येते. 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रकाशित वार्षिकांक स्पर्धेतील पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. शहरी विभागांतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक गट आणि ग्रामीण विभागांतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक गटात सदर स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत शहरी विभागांतर्गत बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या ‘भारती’ या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीच्या ‘प्रतिभा’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसदच्या ‘कल्पना’ या वार्षिकांकास घोषित करण्यात आला आहे. शहरी विभागांतर्गत व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या ‘इन्नोव्हेटर 2022’ या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड मॅनेजमेंट, बडनेराच्या ‘टेक्नोस्ट्रीम 2022’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, अमरावतीच्या ‘टेक्नोरिदम 2022’ या वार्षिकांकास घोषित करण्यात आला आहे.

ग्रामीण विभागांतर्गत बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक इंदिरा महाविद्यालय, कळंबच्या ‘कदंबिनी’ या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुरबाजारच्या ‘फुलोर’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक कला व विज्ञान महाविद्यालय, कु­हाच्या ‘आरोह’ या वार्षिकांकास, तर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावतीच्या ‘पोटेन्शिअल 2022’ या वार्षिकांकास घोषित करण्यात आला आहे. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

संबंधित पारितोषिके प्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दि. 1 मे, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता विद्यापीठाच्या डॉ.के.जी. देशमुख सभागृहामध्ये आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित राहावयाचे आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावयाची असून पारितोषिके प्राप्त महाविद्यालयांचे प्राचार्य आणि त्या ठिकाणी कार्यरत सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्याथ्र्यांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आ.कृष्णा खोपडे यांच्या हस्ते मनपाच्या नागरी आरोग्यवर्धिणी केंद्राचे लोकार्पण

Tue Apr 25 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने लकडगंज झोन येथील श्यामनगर (भवानी नगर) येथे नागरी आरोग्य वर्धिणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण आमदार कृष्णा खोपडे यांच्या यांच्या हस्ते या सोमवार (ता. २४) रोजी करण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख अतिथी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माजी नगरसेवक, दिपक वाडीभस्मे,माजी आरोग्य समिती सभापती प्रमोद पेंडके, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com