पोवाडे गायनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया द्वारे राय नगर कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन करून शाहिर मंडळीने पोवाडे गायन करून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी केली.

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्य गौरव पोवाडे गायन कार्यक्रमाचे उद्घाटन शाहीर राजेंद्र बावनकुळे मानधन समिती सदस्य यांचे हस्ते करित कवी ज्ञानेश्वर वांढरे व शाहीर कलाकार यांनी साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या छायाचित्रास माल्यार्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे व डफाच्या साहाय्याने मानवतावादी मूल्यांची व अधिकाराची जनमानसामध्ये पेरणी केली. शोषित कामगारांच्या अन्यायाला आप ल्या साहित्याच्या माध्यमातुन वाचा फोडुन न्याय मिळ वुन दिला. असे शाहीर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले . तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी ज्ञानेश्वर वांढरे यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शाहिर अरुण मेश्राम, भैय्यालाल माकडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाहिर राजेंद्र बावनकुळे यां चा आयोजक शाहिर भगवान लांजेवार व मंडळा व्दारे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहिर भगवान लांजेवार यांनी करून संचालन नितीन लांजेवार यानी तर आभार प्रदर्शन नत्थुजी चरडे यांनी केले. शाहिर चीरकुट पुंडेकर, वीरेंद्र शेंगर, कवडु रोकडे, विजय चकोले यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन गौरव पोवाडे गायन केले. कार्यक्रमास रामटेक तालुका अध्यक्ष शाहिर रविंद्र मेश्राम,मौदा तालुकाध्यक्ष व उपसरपंच शाहिर वीरेंद्र शेंगर, श्रावण लांजेवार, हिरालाल लूहुरे, पुरुषोत्तम कुंभलकर, रमेश गणोरकर, हरिनाथ लेंडे, गोतमारे, गजानन कच्छवा, नामदेव डाफ, गजानन पुंडेकर, भास्कर बादुले, गजानन सातनुरकर, श्रीभवन केरवर, अशोक हेटे, अनिल बोबडे,विमल वडे, प्रभा काळे, विमल खडसे, वर्षा भोयर, विमल भोयर, शेवंता चरडे, कल्पना हिंगे, गुणा उमाठे, गौरा सोनवणे, बेबी गायकवाड, आशा भस्मे, कुसुम मदनकर, सुरेखा भुते सह परिसरातील शाहीर, कलाकार प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महसूल पुराव्या अभावी बहुतांश कुटुंब जातप्रमाणपत्रापासून वंचित

Wed Aug 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जातीच्या दाखल्यासाठी 50 ते 60 वर्षांपूर्वीचा महसुली पुरावा नसल्यामुळे बहुतांश कुटुंब जातीच्या प्रमाण पत्रापासून वंचित आहेत परिणामी त्यांच्या मुलांना खुल्या प्रवर्गाच्या जागेवर शैक्षणिक प्रवेश व नोकऱ्यांसाठी प्रयत्न करावे लागत आहेत. घटनेने आरक्षण व सोयी सवलती देऊनही कागदोपत्री ते मागास सिद्ध होऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे.जातीच्या प्रमाणपत्रासाठी पुरावा अनिवार्य केल्यापासून बहुतांश कुटुंब कागदोपत्री जातीहीन ठरले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com