नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेत अनिल पांडे आणि प्रमेशा झाडे हे अनुक्रमे रायफल आणि पिस्टल प्रकारात ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले. आहुजा नगर येथील तालुका क्रीडा संकुल येथे रायफल शूटिंग स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेमध्ये १४, १७, १९ वर्षाखालील आणि खुल्या गटात मुले व मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या खेळाडूंमध्ये झालेल्या स्पर्धेत विजयी ठरलेल्या खेळाडूंना ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ म्हणून गौरविण्यात आले. रायफल प्रकारात अनिल पांडे यांनी खुल्या गटातील विजेता आदित्य जगताप यांना मात देत विजय मिळविला. पिस्टल प्रकारामध्ये परमेशा झाडे यांनी प्रियांक पाध्ये यांना मात दिली. स्पर्धेत रायफलमध्ये आदित्य जगताप आणि पिस्टलमध्ये प्रियांक पाध्ये उपविजेता ठरले.
सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अजय हिवरकर, डॉ. विवेक साहु, नरेंद्र इंगडे, खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेचे कन्वेनर नवनीत सिंग तुली, नॅशनल शूटर हर्षल झाडे आदी उपस्थित होते.
संक्षिप्त निकाल
पीप रायफल
१४ वर्षाखालील (मुले)
आरीझ पाटणी (३४९), राघवन नागुलवार (३४७), सोमांश ढवळे (२४७)
१४ वर्षाखालील (मुली)
धारिणी बोऱ्हाडे (३७७), सनाया बघेल (३५३), रिधिमा श्रीवास्तव (३४६)
ओपन रायफल
१४ वर्षाखालील (मुले)
सात्विक मनुस्मारे (३०९), पुंडलिक चन्ने (१९२), आराध्या चौरसिया (१२१)
१४ वर्षाखालील (मुली)
निर्माई सहारे (३६), वेदिका गुप्ता (२५)
एअर पिस्टल
१४ वर्षाखालील (मुले)
वीर चौधरी (३०१)
पीप रायफल
१७ वर्षाखालील (मुली)
अर्णवी खोब्रागडे (३८५), धारिणी बोऱ्हाडे (३७७), सनाया बघेल (३५३)
१७ वर्षाखालील (मुले)
प्रथमेश मेंढेवार (384), हीमांशु गभणे (382), अर्जुन गोमकले (380)
ओपन रायफल
१७ वर्षाखालील (मुले)
सात्विक मनुस्मारे (३०९), संकेत पटले (२५६), पुंडलिक चन्ने (१९२)
एअर पिस्टल
१७ वर्षाखालील (मुले)
वीर चौधरी (३०१), आर्य कृतिवार (२४२)
१७ वर्षाखालील (मुली)
परमेशा झाडे (३५०)
पीप रायफल
१९ वर्षाखालील (मुले)
आदित्य जगताप (३९७), शोहम बागडे (३८९), रोनित बोरकुटे (३८५)
१९ वर्षाखालील (मुली)
अर्णवी खोब्रागडे (३८५), धारिणी बोऱ्हाडे (३७७), रिधिमा श्रीवास्तव (३४६)
एअर पिस्टल
१९ वर्षाखालील (मुले)
प्रियांक पाध्ये (३१६), लकी कडू (३०१), आर्य कृतिवार (२४२)
१९ वर्षाखालील (मुली)
परमेशा झाडे (३५०)
पीप रायफल
२१ वर्षाखालील (मुले)
आदित्य जगताप (३९७), शोहम बागडे (३८९), विद्याराज राठोड (३८७)
२१ वर्षाखालील (मुली)
आरोही कुटेमाते (३८९), शर्वरी मिसूरकर (३८५), अर्णवी खोब्रागडे (३८५)
एअर पिस्टल
२१ वर्षाखालील (मुली)
परमेशा झाडे (३५०)
पीप रायफल
खुला गट (मुले)
आदित्य जगताप (३९७), अनिल पांडे (३९४), विद्याराज राठोड (३८७)
खुला गट (मुलगी)
न्यूसी जैन (३९१), आरोही कुटेमाते (३८९), मानसी कोरके (३८८)
एअर पिस्टल
खुला गट (मुले)
अनंत जगताप (३४४), राहुल खिची (२७१)
खुला गट (मुली)
परमेशा झाडे (३५०), पुष्पलता मनुस्मारे (२७९)
दिव्यांग एअर पिस्टल
रोशनी रिंके (३१७)