संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र :- येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना कार्यालयाकडून कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन काम काजाकरिता देण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे शासकीय मोबाईल अखेर आज शुक्रवारी सर्व अंगणवाडी ,बालवाडी सेविका कर्मचारी युनियन पदाधिकाऱ्याद्वारे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना परत केले.
कामठी तालुक्यांतील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना अंगणवाडीतील दररोजची हजेरी झालेली लसीकरण व बालकांची वजन उंची घेऊन श्रेणी निहाय वर्गवारी करून अति कुपोषित बालकांचे ओळख करून त्यांचा शारीरिक विकास करण्यासाठी लागणारे आहार,आरोग्य सेवा व गृहभेटी ,संदर्भ सेवा लसीकरण याबाबत पूर्ण माहिती पाठविण्याकरिता मोबाईल पुरविण्यात आले होते.आजच्या फाईव्ह जी च्या काळात कर्मचाऱ्यांना टू जी चे मोबाईल देण्यात आले होते.
सदर मोबाईल पुरवठा केल्यापासून त्यात कधी ना कधी बिघाड होत होते ,कामाचा अधिक ताण असतानाच मोबाईल हँग होणे ,गरम होणे,डिस्प्ले उडून जाणे आदी तक्रारी वाढत होत्या.मोबाईल दुरुस्तीची रक्कमही अंगणवाडी कार्यकर्त्या कडून वसूल करण्यात येत होते.सदर बाब वारंवार शासनाला लक्षात आणून दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केल्या जात होते तसेच चांगल्या प्रतीचे मोबाईल पुरविण्या बाबतचा मागणिकडेही कानाडोळा केला जात होता यामुळे संतप्त अंगणवाडी सेविकांनो विविध मागण्यांना घेऊन शासनाला मोबाईल परत केले.
याप्रसंगी या मोबाईल परत आंदोलनात अध्यक्ष विशाखा हाडके,सचिव विद्या गजभिये,भरती नगरकर,शारदा मडकवाडे,लता घुटके,फोरातूनिसा, संगदा मारवाडे, विनंता शेंडे, माया महाजन,मीनाक्षी गाढवे,रंजना फुले,प्रतिभा पाटील,अलका नवघरे,रजनी पाटील,सुरेखा रंगारी, विजयालक्ष्मी लांबट,नलिनी इंगळे आदी उपस्थित होते.