अन् मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या पाटीवर आलं आईचं नाव..

मुंबई :- मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाटी आज सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत दालनाबाहेर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे अशी पाटी लावली आहे.

यापुढे शासकीय दस्तऐवजावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करायची, असे ठरवले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ असे करण्यात आले आहे.

माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरु केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बालभारतीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश, ऐतिहासिक बोधपर कथामालेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Thu Mar 14 , 2024
मुंबई :- बालभारतीतर्फे पाठ्यत्तर प्रकाशित करण्यात आलेल्या इयत्ता तिसरी ते बारावीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन पाठ्यपुस्तकातील संकल्पना सोप्या भाषेत सचित्र उदाहरणासह स्पष्ट करण्यासाठी कोश आणि ऐतिहासिक बोधपर कथामालेच्या तीन भागांचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com