अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा आनंदराव अडसूळ यांनी पदभार स्वीकारला

मुंबई :- माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अडसूळ यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.

अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती तर गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाढाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्यांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अशी माहिती, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती – जमाती आयोगाने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

Wed Oct 2 , 2024
नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी ‘महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री’यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com