अमरदिप बडगे
गोंदिया – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मध्ये रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावातील नागरिकाच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजना आहे.परंतु जसा जसा काळ बदलत चालला आहे तसतसा तंत्रज्ञान विकसित होत आहे. संगणकाच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कामे अवघ्या काही मिनिटांत केले जातात जेवढे लवकर होईल तेवढे लवकर काम होत असल्याने वेळेचा सदुपयोग होत आहे.पण जरा विचार केला आहे आँनलाईन प्रणालीमुळे आज रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांची हजेरी लावली जाते. जर इंटरनेट नेटवर्क नसेल तर मजूरांना कामावरून घरी परत जावे लागत आहे.
तसेच रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांचे आथिर्क नुकसान होत आहे. यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून आँनलाईन घेण्यात येणारी हजेरी बंद करून आफलाईन पध्दतीने च हजेरी घेण्यात यावी. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजुरांनी केली आहे.