पोलिसांचे प्रश्न सोडविण्याकरिता एक आमदार हवाच- प्रमोद वाघमारे

पोलिस बॉईज असोसिएशनची नागपूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

नागपूर – राज्यात पोलिस दलात आज दोन ते सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक पोलिस कर्मचारी महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावित आहेत. परंतु बहुतांश वेळा आपल्या १२ ते १३ लाख परिवारातील सदस्यांकरिता वेळही त्यांच्याकडे नसतो. अशातच दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस कर्मचान्यांच्या विविध समस्यांनाही त्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्यांचे निवारण करण्याकरिता त्यांची कुठलाही प्रकारची ओरड ते शासन दरबारी मांडू शकत नसल्याने पोलिसांचे प्रश्न सोडविण्याकरिता विधानपरिषदेत एक आमदार हवाच, अशी मागणी पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी केली. सिताबर्डी पोलिस कॉर्टर येथे पोलिस बॉईज असोसिएशन नागपूर जिल्हा कार्यकारणीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून पोलिस बॉईज असोसिएशन मुंबई प्रदेशाध्यक्ष सय्यदराजा मुजावर तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस बॉईज असोसिएशन चंद्रपूर जिल्हयाचे अध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस दलातील शहिद जवानांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यपर्ण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर पोलिस बॉईज असोसिएशन नागपूर जिल्हाच्या नव्या कार्यकारणीमधील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल दामोदर, उपजिल्हा उपाध्यक्ष राजेश ढोरे, नागपूर शहर अध्यक्ष चंकी पांडे, ग्रामीण अध्यक्ष पवन दामले, उपाध्यक्ष आकाश (बंटी) वानखेडे यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
पुढे बोलतांना प्रमोद वाघमारे म्हणाले की, पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवारातील विविध समस्यांना शासनदरबारी न्याय मिळावा याअनुषंगाने २०१३ साली पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेने आतापर्यंत पोलिस बांधवांच्या २० ते २२ महत्त्वाच्या प्रश्नांना मार्गी लावण्याचे मोठे कार्य केले आहे. राज्यात दिवसेंदिवस पोलिस कर्मचाऱ्यांवर वाढत असलेले हल्ले. पोलिसांची पोलिसांची ड्युटी आठ तास करणे, कर्मचान्यांना पगार वाढवून देणे, एखादा पोलिस कर्मचारी कर्तव्यावर शहीद झाला तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तसेच त्यांच्या घरातील सदस्याला तात्काळ नोकरीत समाविष्ट करणे, २००५ पासून बंद झालेले पेन्शन पूर्वरत करणे, राज्य पोलिस दलाची भरती वाढविने, पोलिस कर्मचान्यांनाच्या मुलांना नोकरीत १० आरक्षण देणे अश्या ज्वलंत मागण्या आहेत. एकीकडे शिक्षक, राजपत्री अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांसंह अनेक शासकीय आणि निमशासकीय संघटना आपल्या समस्या शासनापुढे आंदोलन किंवा संपाच्या मार्गाने सतत मांडत असतात. परंतु, पोलिस कर्मचाऱ्याला समस्यांसाठी शासनाकडे आपली भूमिका स्पष्टपणे मांडता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने एक स्वतंत्र आम⁶दार विधान परिषदेत पोलिस कर्मचारी प्रवर्गातील नामनिर्देशीत करण्याची मागणीही प्रमोद बाधामारे यांनी केली. यावेळी नागपूर जिल्हयाच्या नवनियुक्त कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन रंजित सिंह तर आभार अमोल सोमकुवर यांनी मानले. यावेळी पोलिस बॉईज असोसिएशन नागपूरचे रितेश वाघ, राजेश ढोरे, पंकज कडू, दिनेश इतपाते, दिनेश तोटलवार, सनी दामोदर, पप्पू शाहू प्रल्हाद, गुड्डू सावडिया, छत्रपाल डोंगरे, किशोर रेवतकर, आकाश वानखेडे, मॉटी ठाकरे, अक्षय दांडेसह पदाधिकान्यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

HDFC: 40 cities Seeks to raise awareness on air pollution through street play in 126 locations

Mon Jun 6 , 2022
Nagpur : To commemorate World Environment Day, HDFC Bank Parivartan today launched a high-decibel campaign called Engines Off to raise awareness on the importance of reducing air pollution. Through a short street play, motorists idling their vehicles at busy traffic intersections will be encouraged to switch off their engines while they wait for the signal to turn green. The bank is […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!