– विदर्भ प्रमुख सारिका उराडे यांची प्रमुख उपस्थिती
नरखेड :- दि.13 ऑगस्ट ला महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची चंद्रपूर जिल्हा येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध तालुक्यातून तळागाळातील कलावंत उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला संपूर्ण कलावंतांनी मी कलावंत आहे हा आप आपला परिचय दिला. त्यानंतर महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची निर्मिती कशी झाली आणि कशाकरिता करण्यात आली याबद्दल सविस्तर विस्तार माहिती या संघटनेच्या विदर्भ प्रमुख सारिका उराडे यांनी रीतसर समजावून सांगितले. कलावंतांनी संघटित होणे ही काळाची गरज या विषयावर सारिका तसेच इतर जेष्ठ कलावंतांनी अतिशय मार्मिकपणे आपापले मत मांडले. या बैठकीमध्ये वृद्ध कीर्तनकार, महिला दंडार मंडळ देखील उपस्थित होते. या सर्व उपस्थित कलावंत मंडळींची नावे खालील प्रमाणे आहेत. तुकाराम कोंडेकर लोकतंत्र सेनानी आणीबाणी बंदी सैनिक, आबाजी भोयर ज्येष्ठ कीर्तनकार, कुसुम मेश्राम, मंगला गडगिल वार, अस्मिता ननावरे, पुरुषोत्तम मेश्राम ,रतीराम डेकाटे ,आनंद गजभिये, राजेंद्र गेडाम ,गुरुदेव कुंभरे ,सुरेश रामटेके, जालीम मेश्राम, कलावती मित्तरवार, जीवन टिपले, संतोष बारसागडे ,सुधाकर डंभारे, विनोद मोहूर्ले ,देवानंद कावळे, शहारुत्सम बंसोड,, यश निकोडे, अनिरुद्ध बारसागडे, रोशन गजभिये, राहुल पेंढारकर, विशेष म्हणजे बैठकीमध्ये गडपिपरी ग्रामपंचायतच्या सरपंच जया बोरकर उपस्थित होत्या. या बैठकीचे व्यवस्थापन कुमारी टीना हिने केले .ही बैठक यशस्वी करण्याकरिता चंद्रपूर समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश मेश्राम, अरविंद पाटील नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष, नागेश फिल्म डायरेक्टर यांनी मोलाचे सहकार्य केले.