संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– धर्मराज मध्ये चिमुकल्यांनी साकारले माती कलेतुन गणपती.
कन्हान :- कलेतुन भावविश्वाची मांडणी करता येते. अत्यंत कमी शब्दात व्यक्त करण्याचे माध्यम कला आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी कला जोपा सावी, असे आवाहन प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लता माळोदे यांनी केले. येथील धर्मराज प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मातीकलेतुन श्री गणेशाच्या मुर्तीची निर्मिती केली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या.
शिक्षणा सोबतच कला कार्यानुभव याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व सुप्तगुणाची जाणीव करण्यासाठी उपक्रमशिल शिक्षक अमित मेंघरे यांच्या संकल्पनेतुन आमचा बाप्पा किती गोड हा उपक्रम वर्ग पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ९० चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध आकारात व रुपात श्री गणरायाची मूर्ती साकारत आम्ही सुद्धा कलेचे उपासक असल्याचे सिद्ध केले आहे. मंगळवार (दि.२६) ला झालेल्या छोटेखानी प्रदर्शनीत या गणेश मुर्ती ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लता माळोदे तर प्रमुख पाहुणे म्हणुन वराडा केंद्र प्रमुख प्रविण बेंदले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय कापसिकर, पालक प्रतिनिधी राजेश्वरी खांदारे, नरेंद्र कडवे, मुख्याध्यापक खिमेश बढिये व धर्मराज काॅन्व्हेंट च्या शिक्षिका कविता साखरकर उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी माती कामाचे निरीक्षण केले. या मातीकलेत प्रथम क्रमांक श्रेयश वंजारी वर्ग २ रा याचा आला. तर इतर चार क्रमांकां मध्ये आरुष धांडे वर्ग १ ला, शरवरी बोरसरे वर्ग ३ रा, आदित्य अरुरकर वर्ग २ रा, प्रियांशी तिडके वर्ग २ रा यांचा आला. यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यां चे शाळेच्या वतिने अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनास धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, उपक्रमाचे आयोजक अमित मेंघरे, भिमराव शिंदेमेश्राम, राजु भस्मे, किशोर जिभ काटे, चित्रलेखा धानफोले, शारदा समरीत, हर्षकला चौधरी, अर्पणा बावनकुळे, प्रिती सुरजबंसी, पूजा धांडे, वैशाली कोहळे, कांचन बावनकुळे, सुलोचना झाडे, नंदा मुद्देवार आदीनी सहकार्य केले.