बसस्थानक चौकात दोन पोलिस कर्मचाऱ्यांतच पेटला वाद

– अश्लील शब्दात शिविगाळ

– एक गणवेशात तर दुसरा सिव्हील ड्रेसमध्ये

– दोन पोलिसांचा वाद पहाण्यासाठी जमली होती बघ्यांची गर्दी

– अश्लील शिवीगाळमुळे महिलांवर आली खाली मान टाकण्याची वेळ

– उपविभागीय अधिकाऱ्यांच्या क्षेत्रातच नागरीकांनी बघीतली रोमांचक घटना

रामटेक :- पोलीस स्टेशन कार्यालय परीसरात दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची तथा वाद होणे हे काही नविन नाही मात्र तेच भर लोकवस्तीत आणि ते सुद्धा बसस्थानक परिसरातील एका नामांकीत हॉटेल मध्ये जेथे नेहमीच शेकडो च्या संख्येने महिला पुरुष असतात अशा ठिकाणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अश्लील शिवीगाळ करीत मोठा वादविवाद होणे ही गंभीर बाब आहे. यावेळी तेथे उपस्थित महिलांना शरमेने मान खाली टाकण्याची वेळ आली असेल यात तिळमात्रही शंका नाही.

घटना काल दि. २६ जुलै च्या रात्री ८ वाजता दरम्यानची आहे. बसस्थानक परिसरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये सदर घटना घडली. रामटेक पोलीस स्टेशन येथील स्टेशन डायरीवर असलेल्या नोंदीनुसार व विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दि. २६ जुलै च्या यात्री ८ वाजता दरम्यान बसस्थानक परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये एक वाहतुक पोलीस गणवेशात होता तर दुसरा सिव्हील ड्रेसमध्ये. एक ट्राफीक पोलीस आहे तर दुसरा साधा पोलिस कर्मचारी. ‘ मी सांगीतलेल्या घटनेची माहीती तु संगणकावर का उतरवली नाही ‘ या मुद्दावरून वाहतुक पोलीसाने सिव्हील ड्रेस वर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालने सुरु केले. ‘ तु मला घटनेची सविस्तर माहिती लेखी दिली असती तर मी त्याची नोंद केली असती ‘ असे सिव्हील ड्रेस वर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याने नम्रपणे सांगीतले. परंतु वाहतुक पोलीस कर्मचारी यावेळी ऐकुण घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे वाद विकोपाला गेला व अशातच वाहतुक पोलिस कर्मचाऱ्याने मोठमोठ्या आवाजात अश्लील शब्दात शिवीगाळ करने सुरु केले. अशातच दुसर्‍या एका वाहतुक पोलिस कर्मचाऱ्याने ‘ तु गणवेशात आहे ‘ असे म्हणत समजविण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व व्यर्थच जात होते. दरम्यान यावेळी येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती असे स्टेशन डायरीच्या दैनंदीन नोंदी मध्ये नोंद आहे. एकंदरीत यावेळी नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्यांची अशी वर्तणुक पाहुन नागरीक अचंभीत झाले.

महिलांवर शर्मेने मान खाली टाकण्याची वेळ

बसस्थानक परिसरातील एक मोठे व नामांकीत हॉटेल म्हणजे येथे काही दाम्पत्य परिवारासह उपस्थित असेल यात शंका नाही. तेव्हा सुरक्षेचे रक्षक असलेल्या वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याच्या अश्लील शिवीगाळीमुळे तेथील विशेषतः महिलांवर शर्मेने मान खाली टाकण्याची वेळ आली असेल यात तिळमात्रही शंका नाही.

याबाबद विचारणा करण्यासाठी तथा भर लोकवस्तीत अश्लील शिवीगाळ करणाऱ्या वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई करण्यात येईल याबाबद विचारणा करण्यासाठी स्थानीक उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे यांचे कार्यालयात दोनदा गेले असता ते कार्यालयात हजर नव्हते. तसेच त्यांना भ्रमणध्वनीवरून फोन केला असता त्यांनी तो कट केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नाथजोगी समाजातील नागरिकांना थेट हातात मिळाले जात वैधता प्रमाणपत्र

Fri Jul 28 , 2023
भंडारा :- भटकंती करणाऱ्या नाथजोगी समाजातील नागरिकांना जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने त्यांच्या घरी जाऊन जात प्रमाणपत्र दिले.शासन आपल्या दारी या येाजनेच्या अंमलबजावणीची ही फलश्रुती म्हणावी लागेल.लाखांदूर तालुक्यातील कोदामेडी या गावाजवळील नाथजोगी समाजातील सहा व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यात आले. नाथजोगी समाज हा मुळात भटकंती करणारा समाज आहे.एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन लोकांचे भविष्य पाहणे व भिक्षा मागून मिळणाऱ्या उत्पन्नातून स्वत:चे व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!