शिवनी भोडकी येथे १८वर्षिय तरूणाची गडफास घेऊन आत्महत्या

– घराच्या छताला घेतला गळफास

रामटेक – रामटेक पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामटेक तुमसर मार्गावरील शिवनी भोंडकी येथिल १८ वर्षिय गुरूदेव कैलाश मेहर याने घरातील छताला गडफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

गुरूदेव कैलाश मेहर वय वर्षे १८ रा.शिवनी भोंडकी हा समर्थ हायस्कुल मध्ये इयत्ता १२ वी इलेक्ट्रिक ट्रेड मध्ये शिक्षण घेत होता. गुरूदेव चे वडिल हे ड्रायव्हर चे काम करित असून गुरूदेव लहान भाऊ व आई सोबत स्वताच्या शेतातील मिरची तोडण्याकरीता गेला होता. दुपारच्या सुमारास मृत गुरूदेव घरी जेवन करण्यासाठी घरी जातो असे आईला सांगुन घरी परतला पण मुलगा शेतात परत वापस न आल्यामुळे सायंकाळच्या सुमारास आई व लहान भाऊ घरी आल्यावर दाराला आत मधुन साखळी लावली दिसली. दरम्यान आवाज दिले असता आतुन काहिच आवाज आला नाही. तेव्हा खिडकीतून डोकाऊन बघितले असता गुरूदेवचा मृतदेह छताला गडफास घेऊन लटकला असलेला दिसला. मृत्युचे कारण अद्यापही समजले नाही. अधिक तपास रामटेक पोलिस करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुरेश उमाठे, रेवती लोखंडे यांना सुवर्ण पदक , खासदार क्रीडा महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

Mon Jan 16 , 2023
नागपूर :- रविवार 15 जानेवारीची सकाळ ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साही सहभागाने अधिक प्रसन्न ठरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही सहभाग तरुणाईला लाजवेल असा होता. व्हीएनआयटी येथे 75 वर्षावरील ज्येष्ठांसाठी घेण्यात आलेल्या वॉकथान मध्ये सुरेश उमाठे आणि रेवती लोखंडे यांनी पुरुष आणि महिला गटात सर्वात कमी वेळेत 1.2 किमी अंतर पार केले. वेगवेगळ्या वयोगटात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!