‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत विभागात  ३ हजार ६५६ ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटिका  – विजयलक्ष्मी बिदरी

§ अमृत वाटिकांमध्ये २ लाख ७४ हजार 200 वृक्ष लागवड

§ देशासाठी बलिदान विरांना आदरांजली

§ ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलकांची उभारणी

नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून ९ ऑगस्टपासुन सुरु होत आहे. यानिमित्त नागपूर विभागातील ३ हजार ६५६ ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहेत. या वाटिकांमध्ये सुमारे २ लाख ७४ हजार २०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासोबत स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक उभारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभर अमृत महोत्सव साजरा होत आहे. या अमृत महोत्सवाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाने होत आहे. हा उपक्रम विभागातील सहा जिल्हा परिषद ६३ पंचायत समिती, ३ हजार ६५६ ग्रामपंचायती, दोन महानगरपालिका तसेच १७ नगरपरिषद व नगर पंचायती मध्ये येथे राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम दिनांक ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक ९ ऑगस्ट रोजी या उपक्रमांतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. हा उपक्रम विभागातील सर्व शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद , पंचायत समिती, महानगरपालिका, नगर पालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायत स्तरापर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.

या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश या उपक्रमासोबतच स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी बलिदान दिलेल्या विरांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील शालेय प्रांगणात शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. शाळेतील दैनंदिन प्रार्थनेनंतर शहीदांच्या शौराबद्दल विद्यार्थ्यांना माहिती होईल तसेच हुतात्मा दिन सन्मानपूर्वक साजरा करण्यात येईल. या मोहिमेला बुधवार दिनांक ९ ऑगस्टपासून संपूर्ण विभागात सुरुवात होईल. यावेळी पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.

विभागातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटीकेसाठी जागा निवडण्यात आली असून प्रत्येक अमृत वाटीकेत ७५ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी विभागातील सर्व ग्रामपंचायतीमधून माती गोळा करुन तालुकाच्या ठिकाणी एक कलश तयार करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यामधून हा अमृत कलश घेऊन जाण्यासाठी युवकांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांसोबतच विभागातील १६ लाख्‍ ३२ हजार ३५७ घरांवर ‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत तिरंगा झेंडा फडकविण्याबाबत मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी तिरंगा झेंडा उपलब्ध होईल यादृष्टिने जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले असल्याची माहिती  बिदरी यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा कामठी शहर अध्यक्ष पदासाठी निवडणूक

Tue Aug 8 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज मंगळवार ला कामठी येथील भागूबाई सभागृह येथे भाजपा कामठी अध्यक्ष निवड साठी बैठक पार पाडली. अध्यक्षपदासाठी 14 नाव आली त्यातील 4 नी नाव परत घेतले. लाला खंडेलवाल, पंकज वर्मा, संगीता अग्रवाल ,गायत्री यादव, प्रभा राऊत, राजा देशमुख, पुष्पराज मेश्राम, उज्वल रायबोले, राज हाड़ोती तर संजय कनोजिया, कपिल गायधने, लालसिंग यादव, सुनील खानवानी, रंजना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com