24 वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मिट क्रीडा महोत्सव 2022 खो-खो (पुरुष) स्पर्धेकरीता अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे दिनांक 3 ते 7 डिसेंबर, 2022 दरम्यान होणा-या 24 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मिट क्रीडा महोत्सव 2022 करीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा खो-खो (पुरुष) संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे दिनांक 26 ते 29 नोव्हेंबर 2022 दरम्यान झाले.

खेळाडूंमध्ये कला व विज्ञान महाविद्यालय, चिखलदराचा रोशन पिवल, विवेक कोडीले व आयुष बोरखडे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा विशाल धोटे व यश हडाले, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा सुमित थोरात, सौरभ नवघरे व प्रतिक पाल, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा महेश भागवत, कला महाविद्यालय, बुलडाणाचा संकेत अगवान व ऋषिकेश जांभळे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा गौरव दहिलेकर, श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूरचा लिलाधर शिंदे, बी.बी. शिवशक्ती महाविद्यालय, बाभुळगावचा शुभम सुरोसे, नारायणराव ए.डी. महाविद्यालय, चांदुरबाजारचा हर्षल वायकर, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोलाचा निखिल बचाटे, स्व.पुसदकर महाविद्यालय, नांदगाव पेठचा चेतन उके व प्रो.राम मेघे इन्स्टिटूट ऑफ टेक्नॉलॉजी, बडनेरा रेल्वेचा आशुतोष नस्करी याचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार - पालकमंत्री दीपक केसरकर

Thu Dec 1 , 2022
मुंबई :- मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ उपक्रमाचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते जी-उत्तर कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!