अमरावती :अमरावती मतदारसंघात विजयाचा कोटा ’47 हजार 101′ इतका निश्चित करण्यात आला आहे.
काँग्रेस चे धीरज लिंगाडे यांना हा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 हजार 584 मतं अद्याप कमी आहेत, तर डॉ. पाटील यांना 5 हजार 930 मतांची गरज आहे. सध्या दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतांची मोजणी सुरु आहे.
सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये १२ उमेदवार बाद झाले आहेत. पण अद्याप कोणालाही विजयी घोषित करण्यात आलेलं नाही.
मतांची आकडेवारी: सकाळी ८.०० वाजे पर्यंत
धीरज लिंगाडे – 43632
डॉ. रणजीत पाटील -41260
प्रत्येक राऊंड मध्ये धीरज लिंगाडे थोडी थोडी आघाडी मिळवित आहेत !