नागपूर :-उत्तर नागपूरच्या लुंबिनी नगरातील रमाई बौद्ध विहार परिसरात संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा हरिचंद्र अंडरसहारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी नगरसेविका ममता महेश सहारे यांच्या सिद्धार्थ नावाच्या मुलाने दान दिला. त्या पुतळ्याचे लोकार्पण जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष ऍड संदीप ताजणे व प्रदेश प्रभारी ऍड सुनील डोंगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भन्ते सुरेई ससाई यांनी पुतळा लोकार्पण प्रसंगी “बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास भारत बौद्धमय व शासनकर्ती जमात” बणविण्यासाठी आपल्या संपूर्ण प्राणाची आहुती दिली, तेच कार्य कांशीरामने बामसेफ व बीएसपी च्या माध्यमातून पुढे नेले. मी आणि कांशीराम अनेक कार्यक्रमात एकत्रपणे सहभागी झालो होतो. आपण बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याचे काम करावे असे त्यांनी आवाहन केले.
भारतीय संविधान व देश एकसंघ ठेवायचा असेल तर बाबासाहेबांनी दिलेला निळा झेंडा व हत्ती या चिन्हाचा सन्मान केला पाहिजे. असे मत बसपाचे युवा प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने यांनी व्यक्त केले. बाबासाहेबांचा होऊ शकते चा आशावाद सर्वसामान्य जनतेत पोहोचवा असे आवाहन प्रदेश प्रभारी ऍड सुनील डोंगरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका ममता महेश सहारे या होत्या. जागतिक कीर्तीच्या भंतेजीची कार्यक्रमातील हजेरी हीच माझ्या कार्याची पावती असल्याचे मत ममता यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रदेश महासचिव नागो जयकर, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसपाचे युवा नेते महेश सहारे यांनी, सूत्रसंचालन माजी नगरसेवक संजय जयस्वाल यांनी तर समापन कोमल जामगडे यांनी केला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने बसपाच्या प्रदेश सचिव रंजना ढोरे, विजयकुमार डहाट, राजीव भांगे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रा सुनील कोचे, सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके यांच्या सोबतच रमाई महिला मंडळ, पुतळा अनावरण समिती, रमाई बुद्ध विहार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.