अलोक ठाकरे, पायल कोरेला सुवर्ण पदक खासदार क्रीडा महोत्सव : क्वान की डो मटेरियल आर्ट

नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील क्वान की डो मटेरियल आर्ट स्पर्धेमध्ये अलोक ठाकरे व पायल कोरेने 18 वर्षाखालील वयोगटात सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. विवेकानंद नगर येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 18 वर्षाखालील वयोगटात मुलांच्या 55 किलोवरील वजनगटामध्ये अलोक ठाकरेने प्रथम, सुशील राऊळेने द्वितीय व सिद्धेश ढोरेने तृतीय क्रमांक पटकावला.

18 वर्षावरील मुलींच्या 50 किलोवरील वजनगटामध्ये पायल कोरेने सुवर्ण पदकावर मोहोर उटविली. पायलकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या दिप्ती पटलेला रौप्य पदकावर तर क्रिष्णाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 15 ते 17 वर्ष वयोगटात 41 किलोवरील वजनगटात मुलांमध्ये अथर्व श्रीपाडवार विजेता ठरला. त्याने अथर्व चौधरीचा पराभव केला. राज उगरेजिया ने तिसरे स्थान प्राप्त केले. मुलींमध्ये अक्षरा ठाकरेने बाजी मारली. संस्कृती बारसेने दुसरे तर आरुषी इडुलकरने तिसरे स्थान प्राप्त केले. 15 ते 17 वर्ष वयोगटात मुलींच्या 41 किलो वजनगटामध्ये सबिया अंसारीने सुवर्ण, माही चावडेने रौप्य व नंदिनी पाठराबेने कांस्य पदक पटकावले.

निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)

15 ते 17 वर्ष वयोगट : 41 किलोवरील वजनगट

मुले : अथर्व श्रीपाडवार, अथर्व चौधरी, राज उगरेजिया

मुली : अक्षरा ठाकरे, संस्कृती बारसे, आरुषी इडुलकर

15 ते 17 वर्ष वयोगट : 41 किलो वजनगट

मुली : सबिया अंसारी, माही चावडे, नंदिनी पाठराबे

18 वर्षावरील मुले : 55 किलोवरील वजनगट

अलोक ठाकरे, सुशील राऊळे, सिद्धेश ढोरे

18 वर्षावरील वयोगट : 50 किलोवरील वजनगट

मुली : पायल कोरे, दिप्ती पटले, क्रिष्णा

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसा !

Wed Jan 31 , 2024
– ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात सांस्कृतिक विभागाकडून केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव युनेस्कोकडे सादर – ‘मराठा लष्करी रणभूमी परिसर’मधील १२ गडकिल्ल्यांच्या समावेशाची शिफारस चंद्रपूर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले महाराष्ट्रातील ११ व तमिळनाडू मधील १ असे १२ गडकिल्ले युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित झाले आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com