ओबीसी कुटूंबातील सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्रावर आवास योजनेचा लाभ देण्यास सुट द्या – सतीश घारड 

– खंड विकास अधिकाऱ्यांना निवेदन 

कन्हान :- राज्य शासनाने मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) पात्र कुटुंबांना घरकुल या योजनेतून लाभ मिळणार आहेत.योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली असून ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल लाभासाठी जातीचे प्रमाणपत्र तयार करतांना समस्या येत आहे, अश्यात पात्र लाभार्थ्यांच्या रक्ताच्या कुटूंबातील सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ देण्यास सुट देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन टेकाडी ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड यांनी खंड विकास अधिकारी पारशिवणी यांना दिले आहे.

ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे,अश्यात जात प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची जुडवा जुडव करतांना लाभार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरी जावे लागत आहे.वेळेत जात प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याने ओबीसी प्रवर्गातील खऱ्या अर्थाने ज्यांना आवास योजनेचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे,अशे लाभार्थी जात प्रमाणपत्राची अट असल्याने आवास योजनेपासून वंचित राहन्याची शक्यता सतीश घारड यांनी व्यक्त केली आहे,तेव्हा सदर योजनेचा लाभ गरजू कुटूंबाला मिळावा यासाठी लाभार्त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ देण्यास सुट देण्यात यावी.जेणे करून ओबीसी प्रवर्गातील गरजू कुटूंबाने देखील तात्काळ या योजनेचा लाभ घेऊन हक्काच्या घरात प्रवेश करता यावा अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे,प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड,सरपंच वराडा विद्या चिखले,पूनम भोवते उपस्थित होते.

सतीश घारड (ग्रा.पं. सदस्य टेकाडी (को.ख.)

इतर मागास प्रवर्गासाठी घरकुला संदर्भात कोणत्याही प्रकारची योजना अस्तित्वात नव्हती.त्यामुळे या प्रवर्गातील कुटुंब पात्र असूनही घरकुल योजनेपासून वंचित राहत होते.अश्यात ओबीसी प्रवर्गासाठी पहिल्यांदा कुठली योजना राबविण्यात येत आहे मात्र, त्यातही जातीचे प्रमानपत्र सक्तीचे करण्यात आले असल्याने अत्यंत गरजू लाभार्थ्यांकडे जात प्रमापत्राची जुळवा जुळव करणे अत्यंत कठीण होत आहे,या विषयाकडे सरपंच संघटने सोबत ओबीसी पुढार्यांनी लक्ष देऊन ओबीसी प्रवर्गाला आवास योजनेचा लाभ मिळणे सुलभ करावे 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केले नानू नेवरे यांच्या छायाचित्रकारितेचे कौतुक

Sat Dec 16 , 2023
नागपूर :-सुप्रसिद्ध फुले आंबेडकरवादी कवी प्रा.यशवंत मनोहर यांचे पोएट्री पोर्ट्रेट नानू नेवरे यांनी मध्यंतरी त्यांच्या कॕमे-याने चितारले होते. ते मनोहर यांना खूपच आवडले होते. तशी मोकळी दाद यशवंत मनोहर यांनी कॕमे-याचा जादूगार नानू नेवरे यांना दिली होती. दरम्यान नागपूरला आले असताना, यशवंत मनोहर यांच्याकडे राजकारणातील भिष्माचार्य शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली. महत्त्वाच्या साहित्यिकांविषयी, कलावंतांविषयी शरदचंद्रजींच्या मनात अकृत्रिम जिव्हाळा आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com