अदानींवर लाचखोरीचे आरोप, अखेर व्हाइट हाऊसचं स्टेटमेंट समोर आलं, भारत-अमेरिका संबंध बिघडणार का?

अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर अब्जावधी डॉलर्सच्या लाचखोरीत सहभागी असल्याचा तसचं सरकारी अधिकाऱ्यांना, अमेरिकेन गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप आहे. अमेरिकन कोर्टात त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेन कोर्टाने त्यांच्याविरोधात अटकेच वॉरंट जारी केलं आहे. या सगळ्या प्रकरणात व्हाइट हाऊसच स्टेटमेंट समोर आलय.

अदानी यांच्याविरोधात जे आरोप लावण्यात आले आहेत, त्याची आम्हाला कल्पना आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप समजून घेण्यासाठी आपल्याला यूएस सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशन आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडे जावं लागेल, असं अदानी प्रकरणात व्हाइट हाऊसचे प्रवक्ते कराइन जीन-पियरे म्हणाले. भारत-अमेरिका संबंधांचा विषय असेल, तर दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, पुढे देखील हे संबंध असेच कायम राहतील. हा असा विषय आहे, ज्यात तुम्ही SEC आणि DOJ शी थेट बोलू शकता. भारत-अमेरिकेमध्ये भक्कम संबंध आहेत असं व्हाइट हाऊसने म्हटलं आहे.

2200 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप

न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात सुनावणी झाली. गौतम अदानींसह 8 जणांवर फसवणुकीचा आणि लाच दिल्याचा आरोप आहे. अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. यूनायटेड स्टेट्स अटॉर्नी ऑफिसच असं म्हणणं आहे की, अदानी यांनी भारतात सौर ऊर्जेशी संबंधित कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 265 मिलियन डॉलर (जवळपास 2200 कोटी रुपये) लाच दिली.

तो पर्यंत निर्दोष

अदानी समूहाने स्टेटमेंट जारी करुन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपात तथ्य नसल्याच म्हटलं आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या डायरेक्टर्स विरोधात यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूनायटेड स्टेट्स सिक्योरिटीज एंड एक्सचेंज कमिशनकडून लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत. आम्ही हे आरोप फेटाळून लावतो. सध्या हे फक्त आरोप आहेत, असं अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटल्याच्या मुद्याकडे अदानी समूहाने लक्ष वेधलं आहे. दोषी सिद्ध होत नाही, तो पर्यंत आरोपीला निर्दोष मानलं जातं.

Credit by tv9 marthi
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत 23 नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी

Fri Nov 22 , 2024
नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून निवडणूक विभाग-जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे योग्य ते खबरदारीचे उपाय योजले आहेत. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मतमोजणीच्या केंद्राच्या परिसरात भारतीय न्याय संहिता 163 अन्वये जमाव बंदी आदेश निर्गमित केले आहेत. ज्यांना सुरक्षा पासेस देण्यात आलेले आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल. 23 नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!