अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून कधीकाळी मुंबईत आलेला एक पत्रकार त्याने आणि आमच्या भावाने यदु जोशीने एकाच दिवशी पत्रकारितेला सुरुवात केली पुढे हा पत्रकार यासाठी ठार वेडा झाला कि एका महिला नेत्याच्या व्यसनी नवऱ्याला तो मामा म्हणायचा आणि या मामाने त्याला कुटुंबातल्याच एका मुलीशी लग्न लावून देण्याचे वचन दिले होते जे न निभावल्या गेल्याने हा पत्रकार वेडा झाला त्याउलट यदुने मात्र अनेकांना त्याच्या लेखणीतून वागण्यातून बोलण्यातून ठार वेडे केले. नेमके तेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या लेकीच्या बाबतीत पंकजा बाबत नेमके भाजपामध्ये घडले म्हणून पंकजा या दिवसात सैरावैरा धावत सुटल्या आहेत. जेव्हा भाजपा शिवसेनेची सत्ता नक्की येणार असल्याचे संकेत मिळाले तेव्हा अर्थात संघ परिवाराला विचारल्या गेले कि नेमके मुख्यमंत्री कोणाला करायचे आणि संघ परिवाराच्या सूचनेवरून ज्यात नितीन गडकरी आघाडीवर होते, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे या तिघांची नावे सुचविण्यात आली ज्यात प्रदेशाध्यक्ष असूनही नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत लाडक्या ठरलेल्या देवेंद्र फडणवीसांचे नाव कुठेही नव्हते पण पुढे गडकरी यांचे नेमके मनसुबे मोदी यांच्या लक्षात आल्याने, संघाकडून सुचविल्या गेलेल्या या तिन्ही नावांचा विचार पूर्णतः मागे पडला आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यातून इच्छुक व उत्सुक असलेले हे तिघेही अस्वस्थ झाले, ते फडणवीसांना पाण्यात पाहू लागले, खडसे यांनी तर अभूतपूर्व गोंधळ कसा घातला हे सर्वसाक्षि आहे, नशीब फडणवीस खमके निघाले वरून त्यांना मोदी यांची मनापासून साथ मिळाली, फडणवीस मोठे होत गेले, खडसेंचे सत्तेच्या राजकारणात बारा वाजले, केवळ गोपीनाथजींची मुलगी म्हणून पंकजा यांच्या वादग्रस्त वागण्याकडे थोडेफार दुर्लक्ष केल्या गेले अन्यथा त्यांचा देखील नक्की अगदी सहज एकनाथ खडसे झाला असता, सुधीर मुनगंटीवार आजही तसे मनातून अस्वस्थ आहेतच पण ते सावध आहेत असतात त्यांनी स्वतःचा एकनाथ खडसे किंवा पंकजा मुंडे होऊ दिला नाही एवढाच काय तो फरक…
मात्र पंकजा मुंडे यांची आजची मानसिक अवस्था आणि पसंतीच्या मुलीशी लग्न लावून न दिलेल्या त्या पत्रकाराच्या अवस्थेसारखी बिकट नसली तरी एकाचवेळी चोहोबाजूंनी नको त्या व्यथांनी आणि कथांनी पंकजा घेरल्या गेल्या असल्याने त्यांना उमजेल असे किंवा सल्ले मिळतील तसे त्या पद्धतीने पंकजा मुंडे आणि भगिनी राजकारणात आणि व्यक्तिगत जीवनात गटांगळ्या खात असतांना त्यातून बाहेर पडण्याचा त्या प्रयत्न करताहेत खरा, पण या अशा भावनिक आणि सहानुभूतीच्या भरवशावर राजकारणात फारसे काही निष्पन्न निघत नसते, मार्ग वेगळे चोखंदळावे लागतात जे पंकजा पेक्षा गोपीनाथ यांच्या तालमीत तयार झालेल्या पुतण्याला थोडक्यात धनंजय मुंडे यांना नेमके अवगत झालेले आहेत पाठ आहेत. वाजवीपेक्षा मोठ्या अपेक्षांनी पंकजा मुंडे यांना यादिवसात राजकीय अडचणीत आणि कौटुंबिक काटकटीत आणून ठेवलेले आहे. पंकजा यादिवसात ज्या तीर्थयात्रेवर निघाल्या आहेत त्या मोठ्या आर्थिक फसवणुकीतून ज्यात वादग्रस्त अमित पालवे कदाचित आघाडीवर असावेत कि कौटुंबिक कलहातून कि जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकीय पीछेहाटीतून, यादिवसात काढलेल्या तीर्थयात्रेतून माझे वाक्य लिहून ठेवा, पंकजा यांना ना कौटुंबिक कलहातून मुक्ती मिळेल ना राजकीय अस्थिरतेतून त्यावर काही तोडगा त्यांना सापडेल. धनंजय मुंडे जिल्ह्याच्या पुढे राज्याच्या राजकारणात डोईजोड ठरणार आहे हे अभ्यासू धूर्त अनुभवी चाणाक्ष गोपीनाथ मुंडे यांच्या 2009 दरम्यान लक्षात आल्याने त्यांनी त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यावर कायमस्वरूपी रस्ता शोधण्यासाठी करिअर मध्ये उत्तम चाललेल्या आपल्या मुलीस पंकजाला वरून तिच्या नवऱ्याला म्हणजे अमित पालवे यांना अमेरिकेतली भारी पगाराची नोकरी सोडून परळीत बोलावून घेतले आणि तेथेच महाजन यांच्या पाठोपाठ मुंडे कुटुंबाचे देखील नकळत किंवा मोठ्या राजकीय महत्वाकांक्षेतून नंतरच्या काळात मोठे नुकसान झाले दुरदैवाने गोपीनाथ यांच्या अपघाती अकस्मात मृत्यूमुळे तर मुंडे कुटुंब सैरभैर झाले. वास्तविक या दिवसात मध्य प्रदेश निवडणुका तोंडावर आहेत आणि तेथे पंकजा मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी असूनही त्या तेथली जबादारी झटकून इकडे तीर्थयात्रेत विनाकारण गुंतल्या आहेत जो वास्तविक पक्षाच्या दृष्टीने पंकजा यांना अडचणींचा त्यांचा निर्णय आहे पण केवळ गोपीनाथ यांच्या कन्या म्हणूनही मला वाटते पंकजा यांच्या या वादग्रस्त वागण्याकडे त्यांचे श्रेष्ठ दुर्लक्ष करताहेत, म्हणून मी खात्रीने सांगतोय कि पंकजा यांची या दिवसातली तीर्थयात्रा त्यांना राजकीय दृष्ट्या नक्कीच पुढे परवडणारी नसेल त्यांचे उलट त्यातून अधिक नुकसान होईल….
क्रमश: हेमंत जोशी