नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासह शहराच्या सौंदर्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्यरत आहे. धो-धो बरसणाऱ्या पावसात देखील नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी मनपाचे स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी आणि अधिकारी नागरिकांच्या सेवेस तत्पर आहेत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्यासह दहाही झोनचे सहायक आयुक्त सकाळपासून स्वतः रस्त्यांवर निरीक्षण करीत आहेत.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात शहरात सर्वत्र स्वच्छता केली जात आहे. पावसाळ्यात देखील पावसाची तमा न बाळगता मनपाचे स्वच्छता दूत आपले कार्य योग्यरीत्या पार पाडत आहेत. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमाती आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले आणि चमू शहरातील नियमित स्वच्छतेवर बारीक नजर ठेऊन आहेत. याशिवाय आपापल्या झोन मध्ये नियमित स्वच्छता व्हावी याकरिता स्वच्छता कर्मचारी वेळेवर हजर राहावेत म्हणून संबंधित झोनचे सहायक आयुक्त सकाळच्या वेळी स्वतः हजेरी स्थानी उपस्थित राहून निरीक्षण करीत आहेत.
पावसाळ्यात रस्त्यांच्याकडेला झाडांच्या फांद्या तुटून पडलेल्या असतात, काही लोक स्वतः कडच्या झाद्यांची छाटाई करून फांद्या व पालापाचोळा रस्याच्याकडेला लावून ठेवता. अशा फांद्यांना जेसीबी आणि टिप्पर च्या सहायाने उचलण्यात येत आहेत. या कामासाठी मनपाद्वारे विशेष मनुष्यबळ लावण्यात आले आहेत. स्मार्ट स्वच्छता चमूचे स्वच्छता दूत रस्त्यावरील कचरा उचलून तो योग्य त्या कचरा गाडीत टाकत आहेत.
नागपूर शहराला स्वच्छतेच्या यादीत आणण्य्साठी मनपाद्वारे विशेष प्रयत्न केले जात असून, प्रत्येत महिन्याच्या सुरुवातीला स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.