नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्याप्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षीत गटातील युवक / युवतींचा विकास घडविण्याकरीता महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) Academy Of Maharashtra Research Upliftment and Traning (AMRUT), या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.
सन 2024-25 यावर्षासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेकडून UPSC/ MPSC स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहानपर अर्थ साहाय्य योजना, AIIMS, IIT, IIM. IIIT या संस्थांमधील शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थ साहाय्य योजना, रोजगारक्षम कौशल्य विकास योजना, कृषी उद्योग प्रशिक्षण योजना, स्वयंरोजगार व उद्योजकते पासून विकास योजना, कृषीक्षेत्रात ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण योजना, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास योजना, C-DAC संस्थेमार्फत माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण योजना, व्यक्तिमत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, उद्योजकांकरीता आर्थिक विकास योजना (व्याज परतावा योजना) यासारख्या आकर्षक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांविषयी अधिक माहिती तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज https://www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
खुल्याप्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षीत गटातील युवक / युवतींनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या संकेतस्थळाला मोठया संख्येने भेट देवून उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.