शहरातील सर्व रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन्सनी “कंपोस्टिंग”वर भर द्यावा

– मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांचे आवाहन

– मनपात आरडब्ल्यूए प्रतिनिधींनीची बैठक

नागपूर :- शहराचे सौंदर्य हे त्या शहरातील नागरिकांद्वारे ठेवण्यात येणाऱ्या दैनंदिन स्वच्छतेने अधिक खुलून दिसते, वैयक्तिक स्वछातेसह शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील नागरिकांची आहे. शहर स्वच्छतेसाठी ओला आणि सुका कचरा निर्मितीस्थळापासून वेगळा करणे गरजेचे आहे. ओला कचऱ्याचे “कंपोस्टिंग” करणे अत्यंत सोपे असून, शहरातील सर्व रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन्सनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्याचे “कंपोस्टिंग” करण्यावर भर द्यावा असे आवाहन मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेद्वारा गुरुवारी (ता.१५) शहरातील सर्व रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन च्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी शहरातील ४० हून अधिक रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन्सचे प्रतिनिधी व सर्व झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

निवासी परिसराची स्वच्छता ठेवण्याकरिता रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन्सनी अर्थात RWA यांची महत्त्वाची भुमिका आहे. निवासी परिसरात मधील व लागुन असलेल्या बाहय परिसराची स्वच्छता, सोसायटीतील प्रत्येक घरातुन निघणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण, प्रतिबंधात्मक एकल प्लास्टिक (Ban Single Use Plastic) वर बंदी व इतर संबंधित विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ. गजेंद्र महल्ले म्हणाले की, ओला आणि सुका कचरा निर्मितीस्थळापासून वेगळा करणे हे बंधनकारक आहे. नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी मनपाच्या कर्मचा-यांसोबत शहरातील नागरिकांचा सहभाग देखील अत्यंत महत्वाचा आहे. रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी जर आपल्या व सभोवतालच्या परिसरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर दैनंदिन स्वरुपात निर्माण होणाऱ्या कचयाचे प्रमाण कमी होईल व भांडेवाडी डम्पिंग यार्ड मध्ये दिसणारे कचऱ्याचे ढीग कमी करण्यास मदत मिळेल. याशिवाय रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी आपल्या सोसायटी, मोहल्ल्यात कचरा वर्गीकरणासंदर्भात नाविन्यपूर्ण कल्पना राबवाव्यात जेणे करून स्वच्छतेने आपले परिसर अधिक बहरून दिसते. असे आवाहनही डॉ. महल्ले यांनी केले.

तसेच सर्व रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन्सनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्याच्या “कंपोस्टिंग” भर द्यावा, लहान लहान उपाय योजना राबवीत आपल्या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून “कंपोस्टिंग” करण्यासाठीचे कल्पक अशी यंत्रणा निर्माण करावी, विघटनशील अशा ओल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, परिसरातील झाडांचा पाला पाचोळा न जळता त्याचा वापर “कंपोस्टिंग” साठी करावा, जेणे करून प्रदूषणावर आळा घालता येईल. आपल्या सोसायटी मध्ये प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्लास्टिकचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा, आपल्या व जवळपासच्या परिसरात रेड, येलो स्पोट निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, वापरत नसलेल्या वस्तूंना रीसायकल, रीयुज, रिफ्युज साठी RRR केंद्रावर आणून द्यावे. ओला कचऱ्यासाठी हिरवा डस्टबीन, सुका कचरासाठी निळा डस्टबीन, सेनेटरी व वैद्यकीय कचऱ्यासाठी लाल डस्टबीन व ई-वेस्ट साठी काळा डस्टबीन चा वापर करावा असे आवाहनही डॉ. महल्ले यांनी यावेळी दिले.

बैठकीमध्ये प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या, नागरिकांच्या तक्रारीसाठी यंत्रणा सुरळीत करण्याची करावी, कचरा संकलन गाड्यांमध्ये नियमितता असल्यास नागरिक रस्त्यांवर कचरा टाकणार नाही, अशा सूचना देखील प्रतिनिधींनी यावेळी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुभव कथन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी गिरवले अभ्यासाचे धडे 

Fri Feb 16 , 2024
– मनपाच्या बाजीराव साखरे वाचनालयातील कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची हजेरी नागपूर :- नागपूर महानगरपालिका बाजीराव साखरे वाचनालय(ई-ग्रंथालय) येथे आयोजित अनुभव कथन कार्यक्रमाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या गटाने नुकतेच हजेरी लावली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सांगितलेल्या अनुभवातून वाचनालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवले. नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल वनामती संचालक डॉ. मिताली सेठी, सिपीटीपीच्या संचाकाल सुवर्णा पांडे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र लोकसेवा आयोग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com