– देशातील नामवंत कवींचा सहभाग : गांधीबाग उद्यानात आयोजन
नागपूर :- भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी २५ डिसेंबर २०२४ रोजी सेंट्रल एव्हेवन्यू येथील गांधीबाग उद्यानात सायंकाळी ६.३० वाजता अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशन सुध्दा सहभाग देणार आहे.
अखिल भारतीय कवी संमेलनामध्ये देशाच्या विविध भागातील प्रसिद्ध कवी आपल्या कवितांची प्रस्तुती करतील. कवी संमेलनामध्ये मुरैना येथील हास्य व्यंग कवी तेजनारायण शर्मा, इटावा येथील वीररस कवी राम भदावर, उज्जैन येथील हास्य व्यंग कवी अशोक भाटी, गाजियाबाद गीतगजल कवी दुर्गेश नंदनी श्रीवास्तव, उदयपुर येथील हास्य कवी मनोज गुर्जर, नागपूर येथील गीत कवी श्रद्धा शौर्य या कवींचा सहभाग आहे.
अखिल भारतीय कवी संमेलनाकरिता लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशनचे व्यवस्थापन सहकार्य आहे. कवी संमेलनामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.