सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात ; दळण दळून घ्यावेत

– दि 4 जानेवारी आज पासुन 4,5,6 जानेवारी 2023 ला सर्व वीज कर्मचारी संपावर..

नागपूर – संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध होय. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील. पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे.उदा BSNL बुडण्यापूर्वी GIO फुकटात आजीवन सिम ,जास्त स्पीड चा भरपूर डेटा पॅक देत होतं आज कमी स्पीड चा डेटा पॅक ला 700 रुपये मोजावे लागतात . उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप आहे. काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील ,वसुल्यामुळे नाराज असतील पण ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारा सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे. ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार करिता हा संप आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सामान्य नागरिकांसाठीही खुले असणार इंडियन सायन्स काँग्रेस,आपल्या पाल्यासह अवश्य भेट देण्याचे आवाहन

Wed Jan 4 , 2023
नागपूर : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कुंभमेळा असणारे इंडियन सायन्स काँग्रेस म्हणजे विद्यापीठाच्या कोप-याकोप-यामध्ये ज्ञानाचा खजिना साठवलेले प्रदर्शन आहे. ऐकायचे असेल तर नवल, बघायचे असेल तर नवल आणि अनुभवयाचे असेल तर विज्ञानाची अनुभूती असे वातावरण या ठिकाणी आहे. सामान्य नागरिकांसाठी ही परिषद खुली आहे. विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरामध्ये अमरावती रोडवरून या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी प्रयोजन आहे. उजव्या बाजुला नोंदणी करण्याचे मोठे डोम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com