कृषी समृद्धी नवनगरे विकसित करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

मुंबई :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या मौजे सावरगांव माळ येथे कृषी समृध्दी नवनगर (स्मार्ट सिटी) विकसित करतांना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

आज मंत्रालयात बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ येथे विकसित करण्यात येणाऱ्या नवनगर (स्मार्ट सिटी) कामाचा आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब. गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, व्यवस्थापक दत्तप्रसाद नडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, सावरगाव माळ येथील उर्वरित भागाचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच ज्या गावांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असेल त्याची अद्ययावत माहिती उपविभागीय अधिकारी यांनी संबंधितांकडून घ्यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत,आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना

Wed Sep 4 , 2024
मुंबई :- मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com