कामांना स्थगिती देण्याचे उद्योग केल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला शिंदे – फडणवीस सरकारने कात्री लावण्याचे केले पाप – जयंत पाटील

मुंबई  :- विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद १२०० कोटींवरून ८४० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात, ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करून १० कोटी करण्यात आली याबाबींकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

IndianOil launches benefits &services for Maruti Suzuki Rewards members

Fri Mar 31 , 2023
One-of-a-kind loyalty program to offer a bouquet of value-add services to over 8 million Maruti Suzuki Rewards members  Additional benefits will incentivize customers every time they refuel their vehicle at any IndianOil fuel station  Mumbai :- Indian Oil Corporation Limited has partnered with Maruti Suzuki India Limited to offer its Maruti Suzuki Rewards members additional benefits and convenience through the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!