– यवतमाळ नगर परिषदेत विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप
– जिल्हाधिकारी,नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही
– परोपटे लेआउट परिसरात दोन वर्षापासून घंटागाडी आलीचं नाही
– अनेक विकासापासून परोपटे लेआउट परिसर कोसो दूर
– मोक्षधामचे घाण पाणी घुसत आहे नागरिकांच्या घरात
यवतमाळ :- आर्णी मार्गावरील वडगाव येथील मोक्षधाम मागे असलेल्या परोपटे-लेआउट विकासापासून कोसोदूर असून या परिसरात सांडपाण्यासाठी नाल्याचं नाही तसेच रस्ते सुद्धा नाही मोक्षधाम मागेच असलेल्या या परिसरात मोक्षधामधील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे परिसरातील नागरिकांनी संबंधित नगरसेवक,जिल्हाधिकारी,यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन परिसरातील समस्येबाबत माहिती दिली मात्र प्रशासनाने निवेदनाची दखल नं घेतल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा परिसरातील नागरिकांनी आरोप केला आहे, तसेच नागरिकांनी पैसे गोळा करून स्वखर्चाने येथील परिसरात नालीचे काम सुरू केले आहे.
काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतचे विलगीकरण नगरपरिषदेत झाले अशातच वडगाव ग्रामपंचायत मध्ये येणारे सर्व प्रभाग यवतमाळ नगरपरिषद गेले, मात्र नगर परिषदेत प्रभाग गेल्याने परोपटे लेआउट मधील नागरिकांना प्रचंड समस्येला सामोरे जावे लागत आहे, परोपटे लेआउट मध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांचे वास्तव्य आहे अशातच या परिसरात कुठेही नाली नाही पक्के रस्ते सुद्धा नाही पावसाळ्यात रस्ते नसल्याने नागरिकांना वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते, अशातच नागरिकांच्या घरातील सांडपाणी हे रस्त्यावर नेहमीच वाहत असते.आर्णी मार्गावरील मोक्षधमच्या मागेच परोपटे लेआऊट असल्याने मोक्षधाम मधील घाण पाणी हे नाल्या नसल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत आहे,अशातच या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून घंटागाडी फिरत नसल्याने येथील नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे,शिवाय दुर्गंधी पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे, या समस्या परोपटे लेआउट मधील नागरिकांनी निवेदनाद्वारे स्थानिक नगरसेवक, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, नगर परिषद मुख्याधिकारी सरनाईक यांच्यासमोर मांडल्या मात्र प्रशासनाने दखल नं घेतल्याने थेट नागरिकांनी पैसे गोळा करीत नालीच्या कामाला सुरुवात केली आहे या परिसरातील नागरिकांमध्ये नगरपरिषद विषयी तीव्र संताप असून येत्या काही दिवसात प्रशासनाचे लक्ष वेधण्या करिता आंदोलन सुद्धा करण्यात येणार असल्याचं यावेळी परिसरातील नागरिक हिरालाल राठोड, गणेश निनावे, बजरंगी प्रसाद शर्मा, प्रशांत चावरे,रवी तडसे, निलेश गावंडे यांनी सांगितले आहे