संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- येथील विकास हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेल्या १९७४ च्या १० व्या वर्गाच्या सुमारे ८० विद्यार्थ्यांनी दखने हायस्कुलच्या प्रांगणात एकत्र येत रंगारंग कार्यक्रमासह सेवानिवृत्त २५ गुरूजन शिक्षकां चा सत्कार करून जुन्या आठवणीसह स्नेहम्मिलन कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.
विकास हायस्कुल कन्हान शाळेतुन १९७४ मध्ये इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या सुमारे ८० विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात ५० वर्षा नंतर एकत्र येत सुवर्ण महोत्सवी वर्षात स्नेहम्मिलन कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव यांच्या अध्यक्षेत सेवानिवृत्त शिक्षक घनश्याम अल्लेडवार , भीमराव खोब्रागडे, एन.एस. मालविये, गोपाळराव कोहळे , दिवाळु देशमुख, यशवंत बाऱई , पद्माकर पोतदार, वेणु बारई, विशाखा ठमके आदी २५ शिक्षकां चा माजी विद्यार्थ्यानी भाव विभोर पणे सत्कार करून आशिर्वाद घेण्यात आला.
आयोजक माजी विद्यार्थी भगवान नितनवरे व मंदा वासनिक यांनी प्रास्ताविका तुन संबोधित केले की, शिक्षकांवरील प्रेमामुळेच सुवर्ण महोत्सवी वर्षात हा स्वागत व स्नेहम्मिलन सोहळा आयोजित करण्यात आला असुन तो चिर संस्मरणिय ठरणार आहे. अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रेमा बद्दल आभार व्यकत करून गुरुदक्षिणा म्हणुन स्विकारण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यादव सर यांनी ५० वर्षां नंतर शिक्षकांचे स्मरण करून त्यांचा सन्मान हा एक अमुल्य स्मरणिय कार्यक्रम असल्याचे संबोधिले.
सुत्र संचालन भाग्यश्री नखाते हयांनी तर पर्यवेक्षक सचिन अल्लेडवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता भगवान नितनवरे, रमेश हजारे, मधुकर नागपुरे, शालिक ठाकरे, वासुदेव चिखले, महेंद्र वानखेडे, गणपती निकोसे, रामु गिऱ्हे, भगवान मंदा वासनिक, रुमा वंजारी, सीमा बागडे, अंजना नाटकर, विजया निमजे, शीला मते आदी विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.