बाधित शेतकरी अनुदानापासून वंचित नाही – अनिल पाटील

नागपूर :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सन 2022 च्या पावसाळ्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीकरीता पात्र बाधित शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी अनुदानापासून वगळला नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजी नगर) तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्याच्या यादीतून वगळण्यात आल्याबाबतचा प्रश्न सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ई-केवायसी न केलेल्या 14165 शेतकऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याकरीता त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी गाव पातळीवरील क्षेत्रीय यंत्रणेद्वारे कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना सूचना दिलेल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवास सुरुवात

Tue Dec 19 , 2023
– उप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन  – ग्राहकांनो, संधीचा लाभ घ्या नागपूर :- जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत धान्य महोत्सव 19 ते 23 डिसेंबर कालवधीत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याचे उदघाटन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री धनंजय मुंडे राहणार आहेत. खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, कृषी विभागाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com