चैत्यभूमी येथे बाबासाहेबांच्या स्मृतींना ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे अभिवादन

नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी अभिवादन केले.

ॲड. मेश्राम यांनी चैत्यभूमी परिसरामध्ये समता परिषद मुंबईच्या वतीने आयोजित भोजन व्यवस्थेला भेट दिली व अनुयायांना भोजन वाटप केले. यावेळी प्रामुख्याने समता परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री भाई गिरकर उपस्थित होते. माजी मंत्री भाई गिरकर यांनी राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांना संविधानाची प्रत भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूत्व ही चतुःसूत्री देतानाच देशाच्या एकता आणि अखंडतेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचे व्यक्तिगत स्वातंत्र्य संविधानाच्या माध्यमातून परिभाषित केले. या संविधानामुळेच १२५ कोटी लोकसंख्येचा देश आज एकसंघ राहून जगाच्या परिप्रेक्षात ज्या गतीने वाटचाल करीत आहे, हा सर्वार्थाने संविधानाचा विजय आहे, असे प्रतिपादन यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले.

समता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद कांबळे, राहुल कांबळे, अशोक कांबळे, मयुर देवळेकर, माजी नगरसेविका समीता कांबळे, दलित मित्र प्रकाश कांबळे, संजय अडागळे, भाऊ कांबळे, उदय पडेलकर, संजय बाविस्कर, दिनकर पवार, सुभाष धोत्रे, सचिन गमरे, सिद्धार्थ सकपाळ व बरेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अखेर कार्तिकचे संरक्षण खात्यात  अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण,, जिद्द, चिकाटीमुळे कार्तिकला घातली यशाने गवसणी...

Sun Dec 8 , 2024
 …..भारतीय सेनेत अधिकारी बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, त्यातील काहीच यशस्वी होतात. यात यवतमाळ  येथील संभाजीनगर मधील सावित्रीबाई फुले सोसायटी मधील  कार्तिक राजू बाजारे याने आपल्या जिद्द व मेहनतीच्या बळावर भारतीय नौदलात सबलेफ्टनंट पदावर अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.   त्याने हे यश जिद्दीच्या बळावर प्राप्त केले. कार्तिक चे प्राथमिक शिक्षण कारंजा(घा ) येथे झाले. तर दहावी पर्यंतचे शिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!