नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या नेहरू नगर झोन अंतर्गत प्रभाग २६ मधील पाणी प्रश्नाचा माजी नगरसेवक व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बुधवारी (ता.१९) आढावा घेतला.
नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्रीकांत वाईकर, डेलिगेट नेहरू नगर व लकडगंज झोन जवाहर नायक व प्रवीण ठोंबरे, श्रीकुमार नायर यावेळी उपस्थित होते.
ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा द्वारे सुरू असलेल्या पाणी पुरवठा संदर्भातील कामाची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. पाणी पुरवठा बाधित भागातील समस्या, अडचणी लक्षात आणून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
याप्रसंगी नेटवर्क इंजिनिअर आशीष गौरखेडे, राजु गोतमारे, सुरेश बारई, अशोक देशमुख, राजेश संगेवार, सुनील आगरे, खुशाल वेळेकर, राम भिलकर, धनंजय चवळे, राम सामंत आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.