संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 22:-बिडी कामगारांचे नेते कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे हे आंबेडकरी चळवळीतील एक समर्पित नेते होते.अशे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी असलेले ऍड दादासाहेब कुंभारे यांचा कामठी शहरात जन्म झाला असून उद्या 23 मार्च ला त्यांचा 99 वा जन्मदिवस आहे.त्यांच्या या जन्मदिनानिमित्त संघर्षमय जीवणातुन त्यांच्या एक जीवन संघर्षावर भन्ते नागदिपणकर यांनी केलेल्या अविस्मरणोय आठवणीतून जीवनकार्यावर घातलेला एक प्रकाश….
भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र आंदोलनात अग्रेसर नागपुर ला नाकारता येत नाही तसेच नागपूर चे उपनगर मानले जाणारे नजिकचे कामठी नामक शहराला ही नाकारता येत नाही .शत शतकापुर्वी याच कामठी नगरातील अस्पृश्यता विरोधी विषमतांना तोंड देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करित गोमा गणेश सावकार, जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन, सिताराम हाडके ,गौरीशंकर गजबे, कर्मविर बाबु हरिदास आवळे ,आर आर पाटिल ,मानके बंधु, हरदास चांदोरकर ,विश्राम सवाईतुल ,विक्रम सनकाडे ,धोंडबाजी मेंढे, मास्तर आदींनी समाज उत्थाना करीता जिवाचे रान करुण आंबेडकर चळवळीत राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याची छाप निर्माण केली .कालांतराने कर्मविर बुद्धप्रिय अॅड दादासाहेब कुंभारे यांनी लोकप्रिय बाबु हरदास एल एन यांचे निधन झाल्या नंतर त्याच्या समग्र जिवनप्रवासातील अस्पुष्यता उद्धारार्थ सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रिडा सहकारीता विविध क्षेत्रातील कामगार आंदोलनातील संघर्षाला वाचा फोडणारे व पुढे त्याला आकार देण्याचे कार्य मोठ्या पोटतिडकीने केले ,,.
नारायण हरी कुंभारे यांचा जन्म दिनांक 23/3/1923ला नया गोदाम कामठी येथे मातोश्री लंक्ष्मीबाई यांचे पोटी झाला .कुटुंबाची आर्थीक कमकुवत असून कुटुंबात सहा बहिणी, दोन भाऊ होते .दरम्यान मध्येच आई लक्ष्मीबाई याचे दुःखद निधन झाले त्यातुन मार्ग काढत सार्वजनिक कार्याची उत्सुकता दादासाहेब उपाख्य ना ह कुंभारे यांना स्वस्थ बसू देत नव्हती परंतु वडील हरिजी कुंभारे याची आपल्या पाल्यानी शिकावे हि जिद्द पुर्णत्वास नेण्यासाठी दादासाहेब कुंभारे यानी शिक्षणाची कास पकडली .कामठी स्थित शासकीय आय ई एम शाळेत आठवी पर्यंन्त शिकले .पुढील शिक्षण त्यांनी नागपुर च्या मारेस कालेज येथे पुर्ण केले. कायद्याचे शिक्षण घेतांना घरची आर्थिक स्थिति व सामाजिक जबाबदारी अनेकदा अड़चन निर्माण करित असतांना 1951साली वकीली पुर्ण केली .
कामठी शहर हे बिडी कारखाणदारीचे शहर म्हणुन प्रख्यात होते कामगाराच्या व्यथा वेदना मांडणारे बाबु हरदास एल एन यांचे पच्छात दादासाहेब कुंभारे यानी कागारांच्या समस्या सोडविण्यासाठी बाबु हरदास एल एन यांनी स्थापना केलेल्या बिडी कामगार यूनियन ला स्वखांद्यावर घेऊन अनेकानेक शहरात व राज्यालगतच्या प्रदेशात परिश्रम घेऊन कामगारांच्या न्याय हंक्का साठी लढा ऊभारला .त्यानी विद्यार्थी दशेत असतांना 1942साली नागपुर येथे आयोजित आल इंडिया दलीत परिषदेच्या वेळी स्व संपादित केलेल्या ‘हृद्य्याचे बोल’ हा कविता संग्रह प्रकाशित केला होता .नागपुर येथे महात्मा गांधी च्या सत्कार प्रसंगी कार्यक्रम उढळुन लावण्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता .शेड्यूल कास्ट फेडरेशन च्या काळात सिध्दार्थ या मासिकाचे संपादन कार्य केले .1954च्या भंडारा येथील निवडनुकिच्या प्रचार कार्यात आपल्या कार्याची चुनुक निर्माण केली. 1965च्या धम्मदिंक्षा सोहळ्याच्या आयोजनातील एक सेनानी म्हणून जबाबदारी पार पाडली .1958मध्ये त्यांची अखील भारतीय रिपब्लिकन पार्टी च्या सचिव पदी निवड झाली .कामगार आंदोलन उभारुण बिडी सिगार अॅक्ट निर्माण करण्याच्या उद्दिष्टाच्या पुर्ती करीता कामठी गोंदिया रायपुर जबलपुर येथील कारखानदारा विरुद्ध लढण्यासाठी कामगारांना प्रवृत्त केले कारखाणदार व शासनास वेठीस धरुण कायदा पास करवुन घेतला .परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणी प्रबुद्ध भारत निर्माण करण्याच्या उद्दिष्टाच्या पुर्ती करीता डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य साधने प्रकाशन समिति सदस्य म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती दिंक्षाभुमी नागपुर चे कार्याध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय स्थापनेकरिता भीक्खु निवास निर्मीती करीता कसोशीने प्रयत्न केला . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र समाजोत्थान आदोलनातील स्वाभिमानी अमर सेनानी जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन यांच्या 1940पासुन स्मृतीभुमी हरदास घाट कन्हान येथील हरदास स्मृति स्मारक वर भरणाऱ्या हरदास मेळावा निम्मित विविध सांस्कृतिक क्रिडा सहकारीता कार्यक्रम राबबुन बाबु हरदास एल एन याच्या स्मृती तेवत ठेवण्या करिता हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था स्थापित करुण हरदास मुलामुलींची प्राथमिक शाळा व हरदास विद्यालय कामठी येथे स्थापित केले .धम्मक्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमंत्वाचा प्रचारक भीक्खु भीक्खुणी संघाच्या आदरतीत्थाकरीता सतत पुढाकार घेऊन प्रचार प्रसार करण्या करीता मदत होईल याचा प्रयत्न केला.
राज्यसभेवर सदस्य म्हणुन सुध्दा त्यानी मागासवर्गिय बोद्ध कामगार आरक्षण यांच्या प्रश्नावर मोठ्ठया प्रमानात प्रयत्नाची पराकाष्ठा करित परिश्रम घेतलेत. ते श्रम मंत्रालय च्या समीतीवर असतांना सर्व श्रेत्रातील विविध प्रकारच्या कामगार हिता साठी अनेकानेक सुचना ,मांडल्या इतकेच नव्हेतर त्याची अंमलबजावनी करण्याकरिता पाठपुरावा केला .संसदेत असलेल्या अनुसुचीत जाती जमाती फोरमचे ते संस्थापक उपाध्यक्ष व नतर कार्यवाह म्हणुन देशातील त्रस्त असनाऱ्या सर्व समुहाकरिता सर्वपक्षीय संसदीय सदस्याच्या मदतीने समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला . बिडी कामगार च नव्हे तर कोलकामगार माईनींग कामगार गिरणी कामगार शेत कामगार यूनियन निर्माण करुण त्याच्या न्याय हंक्का साठी लढा ऊभारला .धर्मातरीत बौद्धाच्या न्याय अधिकार करिता 1977साली आमरण उपवास केला .शासनाला वेठीस आनले तर सामान्याच्या व्यथा वेदना मांडणारे बाबु हरदास एल एन यांचे समग्र जिवनप्रवासातील संघर्षाला स्मरण करुण आंबेडकर चळवळीत राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याची छाप निर्माण करुण सद्धम्मीक जिवन जगण्याचा प्रयत्न करून सामान्याचा मनमिळावु व्यक्तीमंत्व उतुंग शिखराचे धनी कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे विषमतेशी संघर्ष करत असताना वयाच्या 61व्या वर्षी 14आक्टोबर1982ला कर्तव्यावर जात असताना मृत्यु ला सामोरे गेलेत ,.अश्याया समाज भुषण बुद्ध प्रिय कर्मविर कामगार हितेषी अॅड दादासाहेब कुंभारे यांच्या 99 व्या जयंती निमित्त अभिवादनिय आदरांजली अर्पित करण्यात येत आहे.
त्याच्या व जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन यांच्या विस्तृत जिवनकार्याची प्रचिती वर्तमान जनसमुहास व्हावी या करिता कर्मविर अॅड दादासाहेब कुंभारे स्मृति परिसरात जिवन कार्य रुपी शिलालेख उभारल्या जावा जेने करुण कामठी शहराला भुषणावह इतिहास विसरता येणार नाही हिच खरी आदरांजली ठरु शकेल .अशी माहिती भन्ते नागदिपंकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना दिली.
एक जिवन संघर्ष -कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com