– सुभाष ढोके यांचा भीम गीत व प्राबोधन पर कार्यक्रमाने कार्यकर्त्यामध्ये संचारला नवा जोश.
दवलामेटी :-संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, कायदे पंडित, वंचितांचा न्याय हक्कासाठी अहो रात्र लढणारे , महाराष्ट्राचा राजकारणात महत्व पूर्ण व्यक्तीमत्व वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचा जन्म दिवस १० मे हा स्वाभिमानी दिवस म्हणुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो त्याचं प्रमाणे दवलामेटीतील वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नागपूर जिल्हा पदाधिकारी, नागपूर ग्रामीण तालुका पदाधिकारी, शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी वेग वेळ्या प्रकारे प्रकारे बाळासाहेबांचा जन्म दिवस उत्साहात साजरा केला त्याचं अनुसंघाने रविवार ला सायंकाळीं वार्ड क्रं ५ येथील समाज भवणात प्रबोधन पर कार्यक्रम व भीम गीताचा कार्यक्रम क्रांतीचा आवाज, सुभाष ढोके आणि संच यांनी सादर केले.
समाजातील वंचीत घटकांना आता फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव पर्याय आहेत असे या प्रबोधनाचा कार्यक्रमातून प्रबोधनकार व संगीतकार सुभाष ढोके यांनी गायनाचा माध्यमातून नागरिकांना सांगीतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन मंचकावर नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर तसेच जिल्हा सचिव अतुल शेंडे उपास्थित होते. आयोजन कमेटी मध्ये ग्राम पंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश मेश्राम, ग्राम सदस्य श्रीकांत रामटेक, नागपूर ग्रामीण तालुका उपाध्यक्ष सोनु बोरकर, आय टी सेल प्रमुख रोहित राऊत, मधुकर गजभिये, बंटी बोरकर हे होतें.
कार्यक्रमाची प्रस्तावना शरद ढोके, संचालन प्रकाश मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन संदीप सुखदेवे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिपक कोरे, मधुकर गजभिये, रईस डोंगरे, स्वप्नील चारभे, प्रलभ खेडकर, बागडे, वामन वाहने, गौतम खोब्रागडे, प्रीती वाकडे आणि दृगधामना वंचित बहुजन आघाडी कमेटीने विशेष सहकार्य केले.