*(कामगारांच्या ज्वलंत समस्येवर समाधानकारक सरकारतर्फे तोडगा. या चर्चेत कामगार नेते भारतीय मजदुर संघ विदर्भ प्रदेशाच्या अध्यक्षा शिल्पा देशपांडे, महामंत्री गजानन गटलेवार, नागपूर जिल्हा प्रमुख हर्षल ढोंबरे आणि वीज कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव यांची प्रमुख भूमिका)*
नागपूर :- भारतीय मजदूर संघाची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री नामदार सुरेश खाडे यांचे सोबत दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी भारतीय मजदूर संघाच्या विविध उद्योगातील संघटनांच्या प्रलंबित कामगार प्रश्नावर संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे तथा विविध विभागाचे प्रधान सचिव व उपसचिव तथा प्रशासकीय अधिकारी हे उपस्थित होते. बैठकीमध्ये भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशाच्या वतीने शिल्पा देशपांडे, प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, प्रदेश पदाधिकारी नागपूर जिल्हा प्रमुख हर्षल ठोंबरे आणि वीज कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव हे उपस्थित होते. यावेळी विदर्भ प्रदेश भारतीय मजदूर संघाच्या सलग्न संघटनांचे वेगवेगळ्या विभागाचे प्रश्न माननीय उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने वीज कर्मचारी महासंघ, गट सचिव कर्मचारी संघ, अंगणवाडी महिला कर्मचारी संघ, अभयारण्य गाईडस कर्मचारी संघ, महिला आर्थिक विकास कर्मचारी संघ, महाराष्ट्र जल सेवा कर्मचारी महासंघ, आरोग्य रक्षक फवारणी कामगार संघ, मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघ, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल काॅलेज नागपूर येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांकरिता सर्व विभागाचे प्रधान सचिव आवर्जून बैठकीमध्ये उपस्थित होते.
बैठकीमधे उपमुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर अतिशय सकारात्मक चर्चा करून अनेक खात्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या प्रधान सचिवांना सूचना दिल्यात. मागील अनेक वर्षापासून वरील खात्यातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे शासकीय स्तरावर विविध विभागात प्रलंबित असून त्यामुळे दरवेळेस या कर्मचाऱ्यांना घेऊन भारतीय मजदूर संघाला वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आंदोलन करावे लागले. मागील डिसेंबर २०२२ व २०२३ मध्ये वरील प्रश्नांना घेऊन भारतीय मजदूर संघाने नागपूर विधानसभेवर महामोर्चा चे आयोजन केले होते. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र शासनावर पडले. वरील सर्व बाबींची दखल घेत माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी भारतीय मजदूर संघ, विदर्भ प्रदेशाला व महाराष्ट्र प्रदेशाला संयुक्त बैठकी करिता वेळ दिला होता. बैठक अतिशय सकारात्मक संपन्न झाली. यावेळी भारतीय मजदूर संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री सुरेश खाडे व सर्व विभागाच्या प्रधान सचिवांचे आभार, भारतीय मजदुर संघ विदर्भ प्रदेशाचे वतीने मानण्यात आले.