मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई :- पालिकेने स्थानिक पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे तसेच अतिरिक्त दराने पाणी पुरवठा करुन नागरिकांची लूट करणाऱ्या टँकर माफियांची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.

एल (पश्च‍िम), मुलुंड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, स्थानिक लोकांच्या पाण्याची समस्या पालिकेने तातडीने सोडवावी तसेच पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या यंत्रणेने शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाणी टँकर पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी.

पाणीप्रश्न, घरदुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, नादुरुस्त पथदिवे आदी 348 विविध विषयांवर नागरिकांनी तक्रार अर्ज दिले, तर 78 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम दि. 14 ऑक्टोबर रोजी एम ईस्ट वॉर्ड गोंवडी (पूर्व) येथे सकाळी 10 वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in, बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in या लिंकवरही ऑनलाइन तक्रार करता येतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन

Fri Oct 14 , 2022
मुंबई :-  ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात, तसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था गोपालन व गोरक्षणाचे कार्य अहिमहिकेने करीत आहेत. अश्यावेळी पंचगव्यासह विविध गौउत्पादनांचा अधिकाधिक वापर करून गायीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना द्यावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.   दिन्डोशीनगर, गोरेगाव मुंबई येथे प्रथमच आयोजित केलेल्या एक आठवड्याच्या ‘गऊ ग्राम महोत्सवा’चे उदघाटन राज्यपाल कोश्यारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com