रेल्वे चे बदलते स्वरूप-वेगवान बदलासाठी आधुनिकीकरण झाले मंथन!
वाडी :- भारतीय रेल्वे च्या”रेल इंडिया” तर्फे नुकतीच दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर “भारतीय रेल्वे चे बदलते स्वरूप व वेगावन बदलासाठी आधुनिकीकरण”या विषयावर 2 दिवसीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय स्तरावरील चर्चा सत्रा मध्ये रेल्वे बोर्ड व रेल्वे च्या असंख्य विभागातील सर्वोच्च अधिकाऱ्यांना व काही नामांकित परिवहन क्षेत्रात शी सम्बधित खाजगी कंपनीच्या व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांना अभ्यासपूर्ण विषय व सूचना प्रस्तुती करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.तसेच देशभरातील मोठ्या व नामांकित सरकारी व खाजगी कम्पण्याचे या सेमिनार मध्ये प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.एवढ्या महत्वपूर्ण राष्ट्रीय चर्चा सत्रा मध्ये अनुभवी ,वरिष्ठ अधिकारी व नामांकित व्यक्ती सोबत नागपुरातील वाडी येथील निवासी व ऑफ बिझनेस नामक खाजगी कम्पणीत व्यवस्थापक पदावर नुकताच रुजू झालेल्या 22 वर्षीय “आदित्य सुभाष खाकसे” याची या चर्चासत्रात प्रतिनधी म्हणून नव्हे तर नियोजित विषयावर मते प्रस्तुत करण्यासाठी देशभरातील 20 इतर निवडक स्पीकर सोबत निवड करण्यात आली होती. चर्चासत्राच्या दोन दिवसात रेल्वे च्या विविध विभागाचे व खाजगी कम्पण्याचे निमंत्रित वरिष्ठ अधिकारी यांनी नियोजित विषयावर अभ्यासपूर्ण विचार, ,सुचना प्रस्तुत केल्या.नागपूरच्या 22 वर्षीय आदित्य खाकसे ने देखील मिळालेल्या या संधीचे सोने करीत अभ्यासपूर्ण पद्धतीने विषयांची मांडणी व सूचनांचे सादरीकरण केले. या राष्ट्रीय चर्चासत्रात तो सर्वात कमी वयाचा अधिकारी व महाराष्ट्रातील एकमेव प्रतिनिधी होता हे विशेष.या सहभागा बद्दल कार्यक्रम स्थळी आयोजक रेल इंडिया तर्फे त्याला स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्याला मिळालेली ही ऐतिहासिक संधी कुटुंबा सोबत नागपूर करासाठी व युवकांसाठी अभिमानास्पद व प्रेरणदाई ठरेल असे म्हणता येईल. प्रियदर्शनी शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत त्याचे वडील सुभाष खाकसे,डिफेन्स रुग्णालयात वरीष्ठ परिचारिका पदावर कार्यरत त्याची आई प्रज्ञा खाकसे, आकांक्षा खाकसे,रवी जांभूळकर,हरिदास कोसारे,दयाराम जांभूळकर,घनश्याम चव्हाण इ.कुटुंबीया सोबत परिसरातील विविध सामाजिक ,राजकीय संघटना व अनेक मान्यवरांनी आदित्य चे अभिनंदन केले आहे.