महावीर जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने बंद

नागपूर :  “महावीर जयंती” दिनाला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गुरूवार दिनांक १४ एप्रिल, २०२२ ला “महावीर जयंती” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.

          तसेच “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती” दिनानिमित्त गुरूवार दिनांक १४ एप्रिल, २०२२ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्र. २४० दिनांक ०२/०७/२०१८ अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक ०३/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार गुरूवार दिनांक १४ एप्रिल, २०२२ ला “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती” तथा “महावीर जयंती” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ.गजेंद्र महल्ले यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नांदगाव राखबंधा-याची ५६ लाख ९७ हजार रूपयाची लोंखंडी पाईप लाईन चोरी

Wed Apr 13 , 2022
संदीप कांबळे,कामठी – ६ लाख ९७ हजार रूपयाची लोंखंडी पाईप लाईन चोरी  – कन्हान पोस्टे ला अति.अभियंता च्या तक्रारी ने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.  -स्था.गुअशा नागपुर (ग्रा) पथकाने पाच आरो पीना पकडुन ७ ते ८ आरोपीचा शोध घेत आहे. कामठी : – औष्णिक विधुत केंद्र खापरखेडा येथील ५०० मेगाहँट प्लॉट ची जळालेली राख पाईप लाईनने नादंगाव राखबंधारा येथे विसर्जित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights