सीबीएसई 12वीच्या परीक्षेत आदिती बोपचे कामठीतून प्रथम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- केंद्रिय परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल काल 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.त्यानुसार कामठी छावणी परिषद येथील केंद्रीय विद्यालयमध्ये 12 विच्या वाणिज्य मध्ये शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी आदिती विजय बोपचे हिने 97 टक्के गुण प्राप्त करीत अकाऊंटसी विषयात 99 गुण प्राप्त करून कामठी शहरातून प्रथम येण्याचा क्रमांक पटकाविला.

या यशाबद्दल आदिती बोपचे हिच्यावर शाळेचे प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.तर हे सुयश हिच्या पालकासह रेखा गर्ग यांचे मिळालेले मार्गदर्शन मुळे मिळाले असल्याचे सांगितले.आदिती हिने उंच भरारी घेतली असून ती भविष्यात सी ए बनण्याची इच्छाशक्ती दर्शविली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती संभाजी जयंती साजरी

Tue May 14 , 2024
नागपूर :- स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचे चिरंजीव स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची 367 वी जयंती आहे. कही हम भूल न जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत 14 मे रोजी सकाळी 10 वाजता बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांचे हस्ते व आपल्या उपस्थितीत मानेवाडा रोडवरील छत्रपती संभाजी चौकातील (मानेवाडा रिंगरोड चौक) छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. बसपाचे प्रदेश, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com