वाकोडी :-समाजातील गरीब, गरजू व होतकरू विद्दार्थ्याना शिक्षणासाठी मदतीचा हात म्हणून राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजने अंतर्गत आज आदिम यूथ फाऊंडेशन तर्फे सुमारे अठरा विद्दार्थीना २२०००/-₹ शिष्यवृत्ती वितरणाचा अखेरचा टप्पा संपन्न झाला.
यात महाविद्दालयीन शिक्षण घेत असलेल्या खापा येथील दहा तर वाकोडी येथील सात विद्दार्थ्यांचा समावेश आहे.नागपूर येथील बी टेक प्रथम वर्षाला शिकत असलेल्या साक्षी पांडुरंग पराते या विद्दार्थीनीला भाविक भक्तगण एकनाथ महाराज देवस्थान वाकोडी तर्फे प्रायोजित रूपये पाच हजारांची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली.फाऊंडेशन तर्फे या वर्षात ६१ विद्दार्थी यांना आतापर्यंत सुमारे १,३२,०००₹ तर कार्यक्रमापोटी १३०००/- असे एकूण १,४५,०००/-₹ खर्च करण्यात आला.
वाकोडी येथील एकनाथ महाराज देवस्थानात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात फांऊडेशनचे भाऊराव पारखेडकर अध्यक्षस्थानी होते तर देवस्थान तर्फे रमण पराते,गंगाधर पराते,जन्मभूमी सेवा मंडळ वाकोडी चे सुरेश बुरडे,मोरेश्वर बुरडे व ओमप्रकाश पाठराबे अतिथी म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी गंगाधराव पराते व ईतर पाहुणे यांनी विद्यार्थी यांना समायोचित मार्गदर्शन केले.संत कोलबास्वामींच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला प्रास्ताविक आेमप्रकाश पाठराबे, संचालन विनायक वाघ व आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले.याप्रसंगी शिष्यवृत्ती लाभार्थी, गावकरी मंडळी व फाऊंडेशन चे १५ सभासद ऊपस्थित होते.
शंकर मंदिराला धावती भेट
या निमिताने वाकोडी परिसरातील पुरातन शंकर मंदिरालाही धावती भेट देऊन जिर्णोध्दार कामाची पाहणी करण्यात आली व सदस्यांकडून देणगी देण्यात आली.