बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयाने कार्य करा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचे निर्देश 

– लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न

नागपूर :- नागपूर शहर क्षेत्रातील मनपासह सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये जन्माला येणा-या बालकांचे सर्व प्रकारचे लसीकरण वेळेवर व्हावे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यादृष्टीने संपूर्ण यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिले.

मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभागृहामध्ये शुक्रवारी (ता.१५) आयोजित टास्क फोर्स समितीच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी,आरसीएच अधिकारी डॉ.सरला लाड , जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक खान, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. शीतल वांदिले, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अनुपमा मावळे, डॉ शीतल गोविंदलवार, डॉ गोवर्धन नवघरे, डॉ भाग्यश्री गावंडे, सीडीपीओ अर्पणा कोल्हे, सोनाली गावडे, दीपाली नागरे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेत, झोननिहाय लसीकरणाची गती वाढविण्याचे निर्देश दिले तसेच सर्व झोनल आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित भागात जाऊन, रूग्णालयांना भेट देऊन त्वरीत निर्धारित कार्य पूर्ण करावे. लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. शहरातील विविध खासगी रुग्णालयांमधून देखील जन्म झालेल्या बालकांची संख्या आणि करण्यात आलेल्या लसीकरणाचा आढावा नियमित घेण्याचेही त्यांन निर्देशित केले. लसीकरणाची स्थिती, त्यात येणा-या अडचणी आणि उपाय या संदर्भात कार्यवाही व्हावी यादृष्टीने ५ जानेवारीला टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचेही यावेळी अतिरिक्त आयुक्त  आंचल गोयल यांनी सांगितले.

आरसीएच सर्वेक्षण एएनएम आणि आशा सेविकांनी प्राधान्य देत पूर्ण करावे तसेच ‘लसीकरण एक्सप्रेस’ ही मोहीम अधिक जोमाने राबविण्यात यावी अशा सूचना देखील यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिल्या. ‘एनलिस्टींग अनवॅक्ससीनेटेड चिल्ड्रन’ या मनपाच्या विशेष मोहिमे अंतर्गत लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी सुचित केले.

शहर हद्दीत असणा-या आंगणवाड्यांमध्ये लसीकरण कार्यक्रम राबवून बालकांचे लसीकरण करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी सुचित केले. आंगणवाडी कर्मचा-यांद्वारे लसीकरणासाठी संपूर्ण सहकार्य अपेक्षित असून याबाबत विभागाने समन्वय साधण्याचे देखील निर्देश त्यांनी दिले. ज्या भागातील बालकांचे लसीकरण बाकी आहे अशा ‘हाय रिस्क’ ठिकाणी सातत्याने लक्ष द्यावे व जनजागृती करावी, शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत, तेथे देखील जाऊन लसीकरण मोहीम राबवावी असे निर्देश देखील अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले.

बैठकीत सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेची माहिती सादर केली. आरसीएच अधिकारी डॉ.सरला लाड यांनी बैठकीत देण्यात आलेले निर्देश आणि त्यावरील कार्यवाहीची माहिती सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दलित -आदिवासीच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी नवीन कायद्याची गरज - युजीसीचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात यांचे प्रतिपादन

Sat Dec 16 , 2023
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे व्याख्यान नागपूर :- भारतीय संविधानाने समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असला तरी दलित- आदिवासी समाजाबाबत अजूनही भेदभाव दिसून येत आहे. त्यांच्या समस्या वेगळ्या असल्याने सर्वांसाठी सामान धोरण राबविणे योग्य नाही. म्हणूनच दलित -आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी प्रत्येक क्षेत्राकरिता नवीन कायदा आणावा लागेल, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com