मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’आणि ‘दिलखुलास’कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता ‘राज्य निवडणूक आयोगाची तयारी’ याविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत नियोजनबद्ध तयार करण्यात आली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोई सुविधा, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम, कायदा व सुव्यवस्था, राज्यातील सर्वच घटकातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी केलेली तयारी याबाबत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून माहिती दिली आहे.