नागपूर :- विभागातील यावर्षीचे आदर्श तलाठी पुरस्कर जाहिर करण्यात आले आहेत. पाच हजार रूपये रोख व प्रमाणपत्राचा पुरस्कारामध्ये समावेश आहे. हा परस्कार 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
नागपूर विभागातील आदर्श तलाठी म्हणून नागपूर जिल्ह्यातील मानकापूर (रामटेक) येथील प्रतीक कास्टे, वर्धा जिल्ह्यातील दोदुडा (हिंगणघाट) सुधीर पळसराम, भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर (भंडारा) मिनाश्री गोस्वामी, गोंदिया जिल्ह्यातील सौंदड (सडक अर्जुनी ) येथील यु.एस वाघधरे, चंद्रपूर जिल्ह्यातील विजासन (भद्रावती) धनराज पारसे, तर गडचिरोली जिल्ह्यातील वाघोली ( चामोर्शी) येथील सचिन नामदेवराव सोमनकर यांची निवड झाली आहे. नागपूर विभागाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून एका तलाठ्याची निवड करण्यासाठी निवड आज निवड समितीच्या आदर्श तलाठ्याची नावे जाहिर करण्यात आली आहे.
@ फाईल फोटो