संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठीकन्हान मार्गावरील आडा पूल साईबाबा मोळ मंदिरात श्री साईबाबाच्या शोभायात्रेनी साई महोत्सवाला थाटात सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शासन’ क’ श्रेणी तीर्थक्षेत्र श्री साईबाबा मंदिर आडा पूल कामठी कन्हान मार्ग येथे प्रति वर्षानुसार यावर्षी 5 ऑक्टोबर ते 10 आक्टोंबर 2022 पर्यंत श्री साईबाबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री साईबाबा महोत्सवाची सुरुवात कन्हान येथून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत सजविलेल्या रथावर श्री साईबाबा ची प्रतिमा सजवून ढोल, ताशा फटाक्याच्या आतिषबाजीत शोभायात्रा मिरवणूक काढून आडापूल साईबाबा मंदिरात मिरवणुकीचे समापन करण्यात आले मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकृष्ण देवनाथ बाबा यांचे हस्ते श्री साईबाबा मूर्तीची पूजा आराधना आरती करून घटस्थापन करून साई महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
कन्हान वरून निघालेल्या शोभायात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले, 10 ऑक्टोबरला रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दहीकाला करून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. महाप्रसाद कार्यक्रमाचा हजारो भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकृष्ण देवनाथ बाबा व ट्रस्टींनी केले आहे