ॲड.नंदा पराते यांचा नागपूर महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून सत्कार

नागपूर :- काँग्रेसचे दृष्टीकोन व उद्दिष्ट पार पाडण्याच्या जबाबदारीसह नागपूर शहरात महिलांचे संघटन विकसीत करणे व काँग्रेसला जनतेतून जास्तीत जास्त जनाधार प्राप्त करणे ही जबाबदारी ॲड. नंदा पराते यांना पक्ष श्रेष्ठीने दिली. नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ॲड.नंदा पराते यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी जाहीर केले.

नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या या सत्कार प्रसंगी ॲड. नंदा पराते म्हणाल्या की नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याचे श्रेय दिल्ली, मुंबई व नागपूर येथील वरीष्ठ काँग्रेस नेत्यांना आहेत. येत्या विधानसभा निवडणूक व महानगरपालिका निवडणूकीत महिलांना काँग्रेसमध्ये जोडण्यासाठी व महिलांमध्ये काँग्रेसचे उद्देश पोहोचवून महिलांची संघटना विकसीत करून काँग्रेस जनाधार वाढविण्यासाठी वॉर्ड-वॉर्डात महिलांचे संघटन मजबूत करण्यास प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक मतदान बूथ मजबूत करण्यासाठी नागपूरातील सर्व सन्माननीय काँग्रेस नेत्यांचे मार्गदर्शन घेवून बांधणी करण्याची सुरूवात केली आहे.

नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा या पदावर काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी ॲड.नंदा पराते यांची नियुक्ती केली. यानिमित्ताने गोळीबार चौकातील ॲड. नंदा पराते यांच्या निवासस्थानी माजी उप महापौर अण्णाजी राऊत यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र काँग्रेस खाजगी शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष रजत देशमुख यांच्या उपस्थितीत व नागपूर काँग्रेस उपाध्यक्ष मनोज घोडमारे यांनी कार्यकर्त्यांसह ॲड. नंदा पराते यांचा जाहीर सत्कार केला. त्यानंतर नागपूर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष जयंत दळवी, नाविक समाजाचे प्रदेश अध्यक्ष धनराज वलुकर, काँग्रेस सचिव उमेश नगरिकर,संदीप तेलरांधे, संजना देशमुख, हुडकेश्वर प्रभाग महीला काँग्रेस अध्यक्षा निशा नीलटकर, निशिकांत मूल, प्रगेश गोदी, सपना उके, अनिकेत नाईक, सोनिया सिद्धू व विविध काँग्रेस पदाधिकारी गंगाधर बांधेकर, प्रशांत बुरडे, गणेश हेडाऊ,अर्जून गोसावी,शैलेश कोटनाके, नानाभाऊ शनेश्वर, धीरज जुमडे,मनोहर कोल्हे,माधुरी तिजारे, भावना घोडमारे,अनिकेत नाईक,सुभाष तोटे,सतीश राऊत, वामन खडसे,आकाश मेनपिदळे,दिलीप उमरेडकर,राहूल चुनाकर, प्रशांत शेंडे,राजू उमरेडकर,सचिन चांदेकर,जिलानी विराणी,नशीम शेख सह शेकडो कार्यर्त्यांनी ॲड. नंदा पराते यांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोर्शी तालुक्यात पाक सिंचन प्रकल्पातील बंदिस्त नलिकेचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळणार ?

Sat May 11 , 2024
– अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणांमुळे १३९४ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित !  – १८ कोटी रुपयांच्या संपूर्ण कामाची चौकशी करा रुपेश वाळके यांची मागणी !  मोर्शी :- मोर्शी वरुड तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर बंदिस्त पाईप लाईनद्वारे पाणी पोहचविण्याचे स्वप्न साकार करून मोर्शी वरुड तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com