कन्हान :- दिनांक २८/०३/२०२४ रोजी यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान नागपूर ग्रामीण पोस्टे मौदा परिसरात स्टाफसह गस्त व अवैध धंदे रेडकामी गस्त करित असताना बोरगाव शिवारात भंडारा ते नागपूर रोडवर भंडाराकडून येणारे ट्रक क्र. एम. एच ४०/सी. व्ही ७७५० येतांना दिसला. सदर टूक थांबवून ट्रकची पाहणी केली असता ट्रक क्र. एम. एच-४०/सी. ही ७७५० मध्ये आरोपी नामे १) निकेश गंगाधर वाडीभस्मे रा. बासुरा पोस्ट दवळीपार २) शैलेश प्रदीप सपाटे रा. अर्जुनी पोस्ट मानेगाव हे विनापरवाना रेती वाहतूक करित असल्याचे समजले. ट्रक चालकास ट्रकचे कागदपत्र व रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) विचारले असता त्याने ट्रकचे कागदपत्र व रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले, तसेच ट्रक मालक नयन कवळू तुमसरे, रा. मारोडी कॉलनी, मौदा याचे सांगणे वरुन ट्रक मध्ये रेती भरुन घेउन जात असल्याचे सांगीतले. आरोपींच्या ताब्यातून एकूण ०६ ग्रास रेती एकूण किमती १२,०००/- रूपयाचा मुद्देमाल तसेच ट्रक किंमती ३०,००,०००/- रूपये असा एकूण ३०,१२,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोहवा मुकेश दिगांबर रामेलवार, नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कन्हान यांचे रीपोर्टवरून पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपी यांचेविरूद्ध कलम ३७९, १०९, ३४ भादंवि. सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान संतोष गायकवाड यांचे सोबत पोहवा मुकेश रामेलवार, चालक मुकेश यादव यांनी पार पाडली.